नवी दिल्ली – चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सुनावलेल्या शिक्षेचं समर्थन करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं दुसऱ्या दिवशी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली आहे. ‘स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्टला वेळ द्यायला हवा,’ असं ट्विट सचिननं केलंय. स्मिथ, वॉर्नर व बॅनक्रॉफ्ट या तिन्ही खेळाडूंनी काल जाहीर माफी मागितल्यानंतर त्यांच्याबद्दलचा सार्वत्रिक संताप काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे. सचिननं या प्रकरणावर पुन्हा एकदा आपलं मत मांडलं आहे. काल रात्री केलेल्या ट्विटमध्ये सचिन म्हणतो, ‘त्या खेळाडूंना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होतोय. त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही बरंच काही सहन करावं लागणार आहे. त्यांचा आपण विचार करायला हवा. त्यामुळं आपण आता एक पाऊल मागं घेऊन त्यांना थोडा वेळ देण्याची गरज आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here