अनैतिक संबंधातून बौद्ध भिकू ने केली महिला शिष्याची हत्या.
*बौद्ध भिकूचा स्वतः आत्महत्येच्या प्रयत्न फसला*

*बौद्ध भिकूचा स्वतः आत्महत्येच्या प्रयत्न फसला*
(अनिल अडकिने सावनेर
मो.नं-9822724136)
सावनेर-29ऑगस्ट2021
सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत पिपळा (डाक बंगला) येथील मोबाईल वर आलेले मेसेज व व्हाट्सअप मुळे तसेच अनैतिक संबंधामुळे पिपळा(डाक बंगला) येथील भिकू निवास येथे भंतेनी महिला शिष्याची खून केल्याची घटना रविवार दि.29 ऑगस्ट ला दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान घडली.
कुसुम सुनील चव्हाण(45) राहणार इंदिरानगर नागपूर असे मृत महिलेचे नाव तसेच भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिंगूजी मेश्राम(58) मुक्काम पिपळा(डाक बंगला) शिवलि बोधी भिकु निवास,मुळगाव यशोधरा नगर,संजय गांधी नगर नं-2,अमरावती.असे हत्या करणाऱ्या भिकुजी चे नाव आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृत कुसुम ही नागपूर येथील रहिवासी असून तिचा पती सुनील हा व्यसनी आहे.त्यामुळे या महिलेने 12 वर्षापूर्वी संसाराचा त्याग करीत बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसाराची इच्छा बाळगीत भदंत धम्मानंद थेरो यास आपले गुरु बनविले.यादरम्यान 45 वर्षीय शिष्य कुसुम व गुरु भदंत धम्मानंद यांचे सुत जुळले.भर 45 व्या वर्षी सुद्धा कुसुम ची शारीरिक भूक वाढत चालली होती.परंतु भदंत धम्मानंद वयस्क असल्याने कुसुम ची शारीरिक भूक शमत नव्हती.त्यामुळे कुसुम ने दुसऱ्या व्यक्तीशी सूत जुळवून आपले शारीरिक संबंध बनविले. अलीकडे भदंत धम्मानंद जेव्हा जेव्हा कुसुम ला फोन करायचा तेव्हा तेव्हा तिचा फोन व्यस्त राहायचा.ती धम्मानंदचा फोन उचलत नव्हती त्यामुळे धम्मानंद संतापून गेला होता.
दि.29 ऑगस्टला मृतक कुसुंम ही भदंत धम्मानंद यास भेटण्यास पिपळा(डा.बं.) येथे आली असता भदंत धम्मनंदाने नेहमी फोन व्यस्त असण्याचे कारण विचारले तेव्हा कुसुमने भदंत धम्मनंदास म्हटले तू म्हातारा झालास मला माझी गरज पूर्ण करण्याकरिता कुणीतरी पाहिजे असे म्हटले.यावर भदंत धम्मानंद यांचा राग अनावर झाला व त्याने कुसुम च्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड तपासला त्यात त्याला काही आढळले.त्यामुळे धम्मानंदने स्वयंपाक घरातील चाकूने कुसुम वर सपासप वार केले.परंतु या हल्ल्यात तीन चाकू वाकले. कुसुमचा मृत्यू न झाल्याने धम्मानंदाने घरातील पलंगावर कुसुम च्या डोक्यावर हातोड्याने निर्दयतेने वार केले.यात कुसुमचा जागीच मृत्यू झाला.यानंतर धम्मनंदाने स्वतःचा व कुसुम चा मोबाईल फोडला व बाहेर फेकला.व आरोपीने छताला लागलेल्या हुकला दोरी बांधून स्वतःला फाशी लावण्याचा प्रयत्न करीत असता की दोरी तुटली व प्रयत्न फसला.त्यानंतर भिकू निवासा समोरील जनार्दन नरड यांच्या शेतीतील विहिरीत उडी घेतली.परंतु गावकऱ्यांच्या सतर्कतेने भदंत धम्मनंदाला सुरळीत विहिरी बाहेर काढून जीव वाचविला.स्थानिकांनी घटनेची माहिती खापरखेडा पोलिस स्टेशनला दिली.तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी धम्मानंद या आरोपीस घटनास्थळी अटक केली असून आरोपी विरुद्ध भादवि 302 कलमप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.








