Home latest News खामोना -पाचगाव रस्ता ठरत आहे अपघातास आमंत्रण

खामोना -पाचगाव रस्ता ठरत आहे अपघातास आमंत्रण

65

*खामोना -पाचगाव रस्ता ठरत आहे अपघातास आमंत्रण

खामोना -पाचगाव रस्ता ठरत आहे अपघातास आमंत्रण
खामोना -पाचगाव रस्ता ठरत आहे अपघातास आमंत्रण

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की अहेरी
खामोना, पाचगाव वरुररोड एकूण 12 किलोमीटर चा रस्ता असून खुप अरुंद व लहान रस्ता असल्याने या रस्त्यावरून जड वाहतूक प्रतिबंध आहे अश्या अवस्थेत गडचांदूर कडून किंवा तेलंगनातून येणारे मालवाहक वाहन कमी कालावधीत व कमी अंतर लागेल या कारणा साठी खामोना -पाचगाव वरुररोड या मार्गाने जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, याचाच परिणाम या रस्त्याने खुप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे, आज संध्याकाळी 8 च्या सुमारास अहेरी या गावाजवळ मालवाहक ट्रक ने पोस्टमन संतोष बद्देलवार पाचगाव यांना खामोना वरून पाचगाव ला येताना लाईट नसल्येल्या ट्रक ने धडक मारली त्यामुळे त्यांचा पायाला खुप मोठी दुखापत झाली सुद्यवाने ते त्या अपघातातुन बचावले, स्थानिकांनी 108 या टोल फ्रि नंबर वर फोन करून रुग्णवाहिका ला बोलावून संतोष बद्देलवारला सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. खामोनां पाचगाव रस्ता मृत्यू ला आमंत्रण अशी चर्चा तालुक्यात पसरली आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन जड वाहतूक खामोना पाचगाव मार्गाने बंद करावी अशी मागणी माजी तंटा मुक्त अध्यक्ष पाचगाव तिरूपति इन्दुरवार,माजी उपसरपंच पाचगाव श्री.गोपाल जंबूलवार, रुपेश गेडेकर,सुरेश वडस्कर, मारोति चन्ने , विजयं भोयर , सुनिल ग़ौरकार, महेश काकडे, व परिसरातील गावकऱ्याकंडून होत आहे.