औरंगाबाद मध्ये सख्या बहिणीवर भावानेच केला बलात्कार बहिण झाली गर्भवती…

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
औरंगाबाद:- औरंगाबाद मधून एक भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक बातमी समोर आली आहे. आज राज्यात महिलेवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दररोज समोर येत असतात पण या घटनेने संपूर्ण औरंगाबादेतील जिल्हा हादळला आहे.
औरंगाबाद येथील नूर कॉलनी येथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर तिच्याच 33 वर्षीय नराधम सख्या भावाने बलात्कार केला. त्यात त्याची बहिण गर्भवती झाली. आणि ही खळबळजनक घटना समोर आली.
नराधाम भावाने बलात्कार केल्या नंतर काही दिवसानी 15 वर्षिय बहिणीच पोट दुखत होते, बहिण गर्भवती झाल्याचे लक्षात येताच तिचा खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले.
यानंतर अत्याचार पिढीत बहिणीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात नराधम भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी आरोपीला ताब्यात घेत जेरबंद केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक करत आहे.








