रस्त्यावरील खड्डे आणि माणसाचे जीवन…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८

सारेजण म्हणत असतात की, माणूस एक दिवस जन्माला येतो आणि एक दिवस हे जग सोडून जातो हे, अंतिम सत्य आहे. कारण तो निसर्गाचा नियमच आहे कोणीही टाळू शकत नाही. व निसर्गाला कोणीही जिंकू शकत नाही. पण, कधी, कधी काही माणसं त्रासाला कंटाळून जीव देतात तर..काही माणसं वेषणाच्या आहारी जाऊन बिनमोवतीने मरतात तर काही माणसं चिंता करुन जगत असतात याला जीवन जगणे म्हणत नाही. खऱ्या अर्थाने त्यांना जीवनाचे मोलच कळत नाही म्हणून ते स्वतः च्या हाताने सुंदर अशा मानवी जीवनाला वाया गती घालवत असतात हे, खरच योग्य नाही.

वास्तविक पहाता असल्या प्रकारचा उगाचच विचार करायला नको, व मुळात असे चुकीचे पाऊल उचलू नये.त्यापेक्षा संघर्ष करण्याची ताकद आपल्यात ठेवावी. असो,आजचा लेखाचा विषय अनोळखी नाहीच आणि हे, होऊ ही शकत नाही. आज आपल्या गावखेड्याकडे असणारे असे बरेच वाहतुकीचे रस्ते आहेत दिवसभर सुरूच असतात. पण, गावखेड्याकडे असणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा असे, शासनाला खरच वाटत असेल की, नाही माहीत नाही म्हणून विकासाची गंगा गावखेड्याकडे येत नाही.

आज त्याच रस्त्यांवर दिवसभर रहदारी सुरू असते त्या रस्त्याने साधा सायकलने जाणारा माणूस सुद्धा कंटाळून जातो मग खरच तो रस्ता कसा असेल. .?आज सायकल वाल्यांची ही परिस्थिती आहे तर..इतरांचे काय. .?ह्यामध्ये खास करून मला गर्भवती असलेल्या महिलांविषयी लिहावसं वाटतं कारण, त्या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. 

            आज गावखेड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांच्या घरी किंवा त्यांच्याकडे चारचाकी,दोन चाकी गाडी नसतो कारण, गावखेड्यात बहुतांश शेतकरी, मोलमजुरी, गोर, गरीब लोक राहत असतात.त्यांच्याकडे पाहिजे ती सोय नसते एखाद्या घरची गर्भवती महिलेला तालुक्यातील दवाखान्यात न्यायचे असल्यास घरापासूनच अडचणी निर्माण होतात तेवढाच दुसरा त्रास रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातून सहन करावा लागतो या विषयी शासनाने विचार करायला पाहिजे. आजपर्यंत अशा खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत याकडे कोणी लक्ष देत नाही उलट त्यांच्याविषयी जाणून न घेता सरळसरळ म्हणतात की, हा दारू पिऊन गाडी चालवत असेल पण, सत्य परिस्थिती काय आहे ते मात्र कोणालाही दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आज अशा विचारसरणीमुळे गावखेड्याचा पूर्णपणे विकास होत नाही. 

       बरेचदा काही लोक चांगला रस्ता झाला पाहिजे म्हणून झटत असतात पण त्यांनाही यश येत नाही. मग गावखेड्याकडे असणारे रस्ते कसे बरं चांगले होतील…? शहरातील रस्त्यासारखे तर होऊच शकत नाही. म्हणून आजची ही परिस्थिती बघून असं वाटतं की, शासनाची पूर्ण लक्ष फक्त, शहरात राहणाऱ्या लोकांकडे आहे व कारण, तिथे माणसं राहतात गावखेड्यात माणसं राहत नसतील असेच कदाचित त्यांना वाटत असेल. .हे, फार मोठे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. आज एकीकडे विकास होतो तर दुसरीकडे विकास झालेला दिसून येत नाही अशा प्रकारची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे.बऱ्याच जसे, फाटक्या कपड्याला ठिगळ लावल्या जातात तसेच रस्त्यांवर सुद्धा ठिगळ लावलेले दिसून येत आहेत शहरातील मोठे,मोठे झाडे तोडून पशु,पक्षांचे घरटे उदवस्त करुन शानदार रस्ते, उड्डाणपूल बांधलेले दिसून येतात या मधील फरक पाहताना कुठेतरी विचार करायला लावणारे प्रश्न तर आहेतच सोबत मनात विचारही अनेक येत असतात . शासन जेवढे लक्ष शहराकडे देत आहे निदान जास्त नाही तर..थोडेफार तरी गावखेड्याकडे लक्ष द्यावे. कारण, शाळेत जाणाऱ्या मुलांना तरी त्रास होऊ नये.अशा जीव घेणाऱ्या खड्ड्यातून सुटका होणे गरजेचे आहे

कारण एकीकडे विकासाची गंगा पाहून दुसरीकडील लोकांच्या मनात आनंद तर होतंच पण, अपेक्षाही असते. ती अपेक्षा भंग होऊ नये यासाठी जीव घेणाऱ्या खड्ड्यापासून सुटका होणे अत्यंत काळाची गरज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here