शहरी बालविकास प्रकल्पांचे संनियंत्रण महापालिका, नगरपालिकेकडून होणार: मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
शहरी बालविकास प्रकल्पांचे संनियंत्रण महापालिका, नगरपालिकेकडून होणार: मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

शहरी बालविकास प्रकल्पांचे संनियंत्रण महापालिका, नगरपालिकेकडून होणार: मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रभावी समन्वयामुळे शहरी भागातही कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी: महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

शहरी बालविकास प्रकल्पांचे संनियंत्रण महापालिका, नगरपालिकेकडून होणार: मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
शहरी बालविकास प्रकल्पांचे संनियंत्रण महापालिका, नगरपालिकेकडून होणार: मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अमरावती:- नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेमार्फत कार्यरत असलेल्या अंगणवाडीचे मॅपिंग करण्यात आले असून त्या शहरी बालविकास प्रकल्पांशी जोडण्यात आल्या आहेत. शहरी प्रकल्पांचे प्रशासकीय संनियंत्रण नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे देण्याचे प्रस्तावित असून, त्यामुळे इतर शासकीय विभागांशी प्रभावी समन्वय साधने शक्य होणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

शहरी भागात पंचायत राज संस्थांबरोबर समन्वयाचा अभाव असल्याने शहरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेची आवश्यकता राज्यस्तरीय अभ्यासगटाने मांडली होती. त्यानुसार ग्रामीण बालविकास प्रकल्पांच्या धर्तीवर शहरी प्रकल्पांचे संनियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात येणार आहे. यामुळे सर्व विभागांशी प्रभावी समन्वय होऊन योजनांची अंमलबजावणी गतीने होईल व स्थानिक अडचणींचे तत्काळ निराकरण होणे शक्य होणार आहे. अंगणवाडी केंद्रांना मूलभूत सुविधा, आरोग्यविषयक सुविधा आदींसाठी याचा लाभ होईल, असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद लवकरच योजना अंमलात येणार: महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर

https://mediavartanews.com/2021/05/31/children-who-lost-their-parents/

या निर्णयामुळे नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी व इतर यंत्रणा महानगर पालिका क्षेत्रात मनपा आयुक्त तर नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नागरी भागातील व नागरी भागालगतच्या साधारण 20 हजार अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. शहरी भाग व ग्रामीण भागामध्ये योजनेची परिणामकारकता सारखी राहण्यास यामुळे मदत होणार असून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासही मदत होणार आहे.

महाराष्ट्रात नागरीकरणाचे प्रमाण वाढले असून, पूर्वी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या अंगणवाड्या सद्य:स्थितीत नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशासकीय सनियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे देण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी भरती नियमांत सुधारणा करणार
राज्यात कार्यरत सुमारे एका लाखापेक्षा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर पदोन्नती देण्याबाबत विचार होत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या भरती नियमांची निर्मिती करण्याचे आदेशही विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र अंगणवाडी सेविकांना बालविकास प्रकल्प अधिकारी या पदापर्यंत पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रयत्न होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here