Home latest News मुंबई विरारच्या ICICI बँकेचा माजी मॅनेजर टाकला सशस्त्र दरोडा, असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू,...

मुंबई विरारच्या ICICI बँकेचा माजी मॅनेजर टाकला सशस्त्र दरोडा, असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू, तर कॅशियर महिला गंभीर जखमी

114

मुंबई विरारच्या ICICI बँकेचा माजी मॅनेजर टाकला सशस्त्र दरोडा, असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू, तर कॅशियर महिला गंभीर जखमी

मुंबई विरारच्या ICICI बँकेचा माजी मॅनेजर टाकला सशस्त्र दरोडा, असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू, तर कॅशियर महिला गंभीर जखमी
मुंबई विरारच्या ICICI बँकेचा माजी मॅनेजर टाकला सशस्त्र दरोडा, असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू, तर कॅशियर महिला गंभीर जखमी

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई/ विरार,दि.31 जुलै:- मुंबईच्या उपनगर विरारमधुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विरारमध्ये बैंकच्या माजी व्यवस्थापकाने बैंकेतील कर्मचाऱ्यांवर धारदार हत्याराने वार करुन बैंकेत दरोडा टाकला ही घटना गुरुवारी (29 जुलै) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने 1 कोटी 38 लाखांची रोख आणि सोनं घेवून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. आरोपीने कर्जबाजारीपणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

विरार पूर्वेतील रेल्वे स्टेशन परिसरातील ICICI बँकेत गुरुवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली होती. बैंकवर दरोडा टाकणारा दुसरा तिसरा कुणी नसून बैंकेचा माजी व्यवस्थापक आहे. या हल्ल्यात बैंकेची असिस्टंट महिला मॅनेजरचा मृत्यू झालाय. तर कॅशियर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेच्या वेळी बॅंकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे घटना…
गुरुवारी आठ वाजता आयसीआयसीआय बॅंकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बॅंकेतच काम करत होत्या. बॅंकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले.

घटनेचं गांभीर्य ओळखून श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. त्यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र तोपर्यंत आरोपी अनिल दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत श्रद्धाने प्रतिकार केला. पण आरोपीसमोर तिची ताकद कमी पडल्याने त्याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.

बैंकेत सुरक्षा रक्षकच नाही
बैंकेतील आरडाओरडा पाहून बाजूलाच असणाऱ्या काही जिगरबाज तरुणांनी आरोपीला बॅगेसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित घटनेनंतर आज (30 जुलै) मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पण सुरक्षा रक्षक जर बँकेसमोर असते तर एवढी मोठी घटना घडली नसती. महिलेचा जीव गेला नसता. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दरोडेखोर हा अ‍ॅक्सिस बैंकेचा व्यवस्थापक.
दरोडेखोर आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगांव येथे अ‍ॅक्सिस बॅंकेचा मॅनेजर आहे. आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विरार पोलिसांनी आज वसई न्यायालयात अनिल दुबेला हजर केलं. वसई न्यायलयाने आरोपीला 6 ऑगस्ट पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.