भीम आर्मी मुंबई प्रदेशाध्यक्षा कु.जयाताई बनसोडे यांच्या मदतीच्या आवाहनाला मुंबई पोलिसांसह जनसामान्यांचा भरघोस उदंड प्रतिसाद.
भीम आर्मीचे स्वाभिमानी नेतृत्व समाजरक्षक कर्मयोद्धा प्रफुल्लभाई शेंडे यांनी केले कौतुक.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.31 जुलै:- संपूर्ण कोकण पट्टा, सातारा -सांगली-कोल्हापूर ह्या व महाराष्ट्रातील इतर भागांना मुसळधार पावसाने शब्दशः झोडपून काढले असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली असून हजारो लोकांचे संसार वाहून गेले आहेत.हजारो गायी गुरे नामशेष झाली आहेत. राहायला घर नाही की खायाला अन्न नाही, अश्या विचित्र परिस्थितीत पूरग्रस्त जनता अडकली असून, महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था, शासन-प्रशासन आपापल्या परीने ह्या पूरग्रस्तांना होईल ती आणि करता येईल तशी मदत करण्याचे काम करीत असून भीम आर्मी चीफ भाई चंद्रशेखर आझाद आणि समाजरक्षक प्रफुल्लभाई शेंडे यांच्या असीम प्रेरणेतून, भीम आर्मी मुंबई प्रदेशसुद्धा युद्धपातळीवर मदतकार्यात सरसावली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य भीम आर्मीचे प्रमुख नेते भिमपँथर राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराला दिली आहे.
मुंबई प्रदेशाध्यक्षा जयाताई बनसोडे यांनी महाराष्ट्रातील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू झाला असून त्याची सुरवातच पोलीस प्रशासनाकडून झाली आहे. मुंबईचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोपट साळुंखे साहेबांनी जयाताईने केलेली पोस्ट वाचताक्षणी २०० किलो तांदूळ , कांदे , बटाटे , बिस्किटे आणि इतर सामान पाठविण्यासाठी फोन केल्याची माहिती संतोष गायकवाड यांनी दिली आहे. साळुंखे साहेबांना मुंबईचे गुन्हेगार थरथर कापतात.परंतु हा गणवेशातील माणूस नेहमीच कोणत्या ही कार्यात ठामपणे उभा असतो, अगदी मग ते काम छोट्यातले छोटे असो किंव्हा मोठ्यातले मोठे, जयाताई बनसोडे यांनी केलेल्या महाडच्या मदतीच्या आव्हानांची पोस्ट पाहून साळुंके साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मदतीची घोषणा करताच मुंबई पोलीस पुढे सरसावले आणि त्यांनी अल्पावधीतच सुमारे ७०० किलो तांदूळ , ५०० किलो दाळ , २५० पॉकेट कुरकुरे , २०० किलो गव्हाचे पीठ , १०० किलो बटाटे , ७० बॉक्स पाण्याच्या बॉटल्स , ५० किलो साखर , १६ बॉक्स बिस्किटं , १५ किलो चहापावडर , तिखट मसाला , मीठ इत्यादी अत्यावश्यक वस्तू ताबडतोब प्रदेशाध्यक्षा जयाताई बनसोडे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती भिमपँथर राजेश गवळी यांनी दिली आहे.
तसेच BARCच्या जयश्रीताई धेंडे, रेल्वेचे अधिकारी चंद्रमनी दांडगे साहेब व इतर सर्व कर्मचारी, अंधेरीच्या अर्चनाताई कांबळे यांनी सॅनिटरी पॅड बॉक्स दिले असून काही दानदात्यांनी मुंबई प्रदेश समन्वयक मा.संतोषजी गायकवाड यांजकडे रेशन किट दिले असल्याचे भिमपँथर राजेश गवळी यांनी सांगितले. सर्व सामाजिक ,राजकीय कार्यकर्ते, सढळ हाताने जयाताईंकडे मदत करत आहेत आणि सोबत उभे आहेत. ह्यावर बोलताना ” आपला समाज जेव्हा सर्व वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन संकट समयी विश्वासाने एकत्र येतो, तेव्हा वाटते अजून ही चांगुलपणा ह्या देशात टिकून आहे. म्हणूनच हा देश आम्हाला आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहे. तुम्हा सर्व लोकां मुळे आम्हाला जगण्याची,लढण्याची प्रेरणा मिळते , हे नक्की , अश्या शब्दांत मुंबई प्रदेशाध्यक्षा जयाताई बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.








