जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सर्वोदय कन्या विद्यालयाचा संघ विभागस्तरावर

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सर्वोदय कन्या विद्यालयाचा संघ विभागस्तरावर

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सर्वोदय कन्या विद्यालयाचा संघ विभागस्तरावर

✍🏻अमान क़ुरैशी✍🏻
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही:- क्रीडा व युवक संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा वयोगट 14 वर्षाखालील मुली तालुका क्रीडा संकुल, विसापूर (बल्लारशाह) येथे दिनांक ३० आगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आली.
सदर स्पर्धेत विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय,सिंदेवाही चा संघ जिल्हास्तरीय अंतिम सामन्यात विजय संपादन करून विभाग स्तरावर निवड करण्यात आली.
विजयी चमुचे संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल, सचिव अरविंदजी जयस्वाल, मुख्याध्यापिका संगिता यादव, पर्यवेक्षक विलास धुळेवार, क्रीडा शिक्षक कृष्णा ठिकरे,विनय खोब्रागडे व इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here