Home latest News योग दिनानिमित्त रविवारी सायकल रॅली* *योग दिनी विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम*

योग दिनानिमित्त रविवारी सायकल रॅली* *योग दिनी विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम*

77

*योग दिनानिमित्त रविवारी सायकल रॅली*

*योग दिनी विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम*

योग दिनानिमित्त रविवारी सायकल रॅली* *योग दिनी विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम*
योग दिनानिमित्त रविवारी सायकल रॅली*
*योग दिनी विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

औरंगाबाद, दि.19 (जिमाका) : औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत 21 जून रोजी सकाळी 7 वा. विभागीय क्रीडा संकुलाच्या बंदिस्त प्रेक्षागृहामध्ये सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. तसेच योगा दिनाची जनजागृती करण्यासाठी 20 जून रोजी सकाळी 7 वा क्रांतीचौक येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.रॅलीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी दिली.
योगा दिनाची जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात येत आहे. रॅलीचा मार्ग – क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय आहे.
रॅलीस सकाळी 6.15 वा .स्पर्धकांची उपस्थिती, सकाळी 6.45 वा . रॅलीस प्रारंभ, सकाळी 7.30 वा . सर्व स्पर्धकाची जिल्हाधिकारी कार्यालय , औरंगाबाद येथे उपस्थिती, सकाळी 7.30 ते 8.00 वा .
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची स्पर्धकांशी ओळख, सकाळी 8 ते 8.30 वा. ड्रॉ पध्दतीने प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक काढून बक्षीस वितरण, चालू वर्षातील उत्कृष्ठ सायकल पटूंचा सत्कार होणार आहे. तरी सायकल स्वारांकडे
मास्क व हेलमेट असणे आवश्यक असल्याचेही श्रीमती नावंदे यांनी कळवले आहे.