वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेशभाऊ विश्वकर्मा यांचे नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना मदत दौरा.

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली,दि.31 जुलै:- महाराष्ट्रातील महाभयंकर पूरस्थितीमुळे बरेचशे जिल्हे व शहरे बाधित झाली आहेत. वंचित बहुजन आघाडी तर्फे मदतीचे काम सुरु झालेले आहे. सर्वाधिक बाधित अशा कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यातील गावे आणि शहरांमध्ये पक्षाच्या परिपत्रका नुसार जिल्ह्या जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेशभाऊ विश्वकर्मा यांचे नेतृत्वाखाली आज सातारा जिल्ह्यातील गाव कोंढावळे ता. वाई येथे पूरग्रस्त घरांची व परिसराची पाहणी करून तेथील नागरिकांना दिलासा दिला व 50 कुटुंबातील लोकांना ब्लॅंकेट चादरी देऊन निवाऱ्या साठी मदतकार्य केले. \

सर्व गरजूंना अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू व इतर सर्व अडचणींचा आढावा घेतला व लवकरात लवकर पुनर्वसन होण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या दौऱ्यामध्ये राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, प्रा. सोमनाथ साळुंखे सर प्रियदर्शी तेलंग, ॲड. सचिन जोरे (माजी न्यायाधीश), प्रा. सम्राट शिंदे सर, सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, सनी तुपे, वाई तालुकाध्यक्ष सुजित कांबळे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








