Home latest News बँड पथकांना अर्थसहाय्य करा, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची मागणी

बँड पथकांना अर्थसहाय्य करा, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची मागणी

79

बँड पथकांना अर्थसहाय्य करा, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची मागणी

बँड पथकांना अर्थसहाय्य करा, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची मागणी
बँड पथकांना अर्थसहाय्य करा, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची मागणी

नीलम खरात ✒
मुंबई महानगर प्रतीनिधी
मुंबई:- लॉकडाऊन मुळे अंधेरी मधील वर्सोवा येथील बँड पथकांना गेल्या दीड वर्षांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लग्न समारंभ बंद असल्याने मुंबई परिसरातील बँड पथकांची आर्थिक ओढाताण होत आहे. या पथकांना शासनाने अर्थसहाय्य करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात दिव्या ढोले यांनी म्हटले आहे की , कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे विवाह समारंभांवर निर्बंध आले आहेत. वर्सोवा येथील कोळीवाड्यातील बँड पथकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पथकांना शासनाने अशा कठीण काळात अर्थसहाय्य करून आधार द्यावा.

वर्सोवा गावातील १६ बँड पथकांच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.लॉकडाऊन काळात राज्य सरकार कडन मदत न मिळाल्याची खंत या प्रतिनिधींनी व्यक्त केली. विवाह समारंभासाठी कार्यालयांमध्ये कधी ५० तर कधी १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र बँड वाजविण्यास मनाई केली गेली . गेली दीड वर्षे व्यवसाय बंद असल्याने २७५ बँड पथकाचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत, असेही दिव्या ढोले यांनी पत्रकात म्हटले आहे.