फियाट, जनरल मोटर्स पाठोपाठ फोर्ड कार कंपनीचा भारतात कायमचा ब्रेक

फोर्ड कंपनीच्या निर्णयानुसार २०२१ च्या वर्षा अखेरपर्यंत गुजरातचा प्लांट तर जून २०२२ मध्ये चेन्नई प्लॅन्टमधील कारच उत्पादन पूर्णपणे बंद होणार आहे. या निर्णयामुळे ५५,००० भारतीयांच्या नोकऱ्या सुटणार आहेत.

car companies in india
फियाट, जनरल मोटर्स पाठोपाठ फोर्ड कार कंपनीचा भारतात कायमचा ब्रेक

सिद्धांत:
मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२१: अमेरिकन कार कंपनी फोर्ड मोटर्स भारतातील कार उत्पादन कायमस्वरूपी बंद करणार असून जून २०२२ पर्यंत भारतीय मार्केटमधून पूर्णपणे बाहेर पडणार आहे.यामुळे जवळपास ५५,००० भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या स्टेटमेंटनुसार भारतामध्ये फोर्ड कार्सची मंदावलेली विक्री आणि त्यामुळे झालेला अंदाजे चौदा हजार कोटींचा तोटा यांमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे दिसून येते.

फोर्ड कंपनीची भारतातील सुरुवात.

अमेरिकेतील मिशीगन येथे १९०३ साली स्थापन झालेल्या फोर्ड कंपनीने १९९० च्या दशकात भारतामध्ये प्रवेश केला होता. जवळपास २ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करत चेन्नई आणि गुजरातमधील सानंद येथे कार उत्पादन करणारे भव्य कारखाने उभारले. फोर्डच्या ३५० एकरावर पसरलेल्या चेन्नई प्लांटची वर्षाला २००,००० कार आणि ३४०,००० इंजिन्स बनविण्याची क्षमता आहे तर सानंद प्लांटची वर्षाला २४०,००० कार आणि २७०,००० इंजिन्स बनविण्याची क्षमता आहे. फोर्ड एस्कॉर्ट मॉडेल हि भारतातील फोर्डची पहिली कार होती. त्यानंतर त्यांनी फिगो, अस्पॅयर, फ्युजन, इकोस्पोर्ट, एन्डेऔर, फ्रीस्टाईल सारख्या कार भारतात लाँच केल्या.

परंतु गेल्या दोन दशकात कंपनीला भारतीय मार्केटमधील शेअर वाढवण्यात पूर्णतः अपयश आलं. २००० च्या दशकात ८००० कार्सची विक्री करणाऱ्या फोर्डने २०१९ पर्यंत ९३,००० कार विकण्याइतकी मजल मारली होती. पण या काळात कंपनीचा मार्केट शेअर मात्र २.८ इतकाच वाढू शकला. कोरोना पँडेमिकच्या काळातील २०२० आणि २०२१ चालू वर्षात फोर्ड कारची विक्री अधिकच मंदावली. २०२० मध्ये ६६,००० आणि २०२१ मध्ये फक्त ४८,००० कार कंपनीमार्फत विकण्यात आल्या. सध्या फोर्डच्या चेन्नई आणि गुजरातमधील ४५०,०० उत्पादन क्षमता असलेल्या दोन कारखान्यामध्ये एकूण उत्पादन क्षमतेच्या केवळ २०% उत्पादन चालू आहे.

२०२१ – कार कंपन्यांचं भारतातील मार्केट शेअर. फोर्ड नवव्या स्थानी (1.77%)

 

कंपनीच्या निर्णयानुसार २०२१ च्या वर्षा अखेरपर्यंत गुजरातचा प्लांट तर जून २०२२ मध्ये चेन्नई प्लॅन्टमधील कारच उत्पादन पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे फॅक्टरी मंध्ये काम करणारे कामगार, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, डेटा रिसर्चर्स, फायनान्स आणि अकाउंटिंग प्रोफेशनल्स आणि फोर्डच्या देशभरातील ४०० कार स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या ५५,००० भारतीयांच्या नोकऱ्या सुटणार आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, अगदी पाच महिन्या अगोदर फोर्डद्वारे देशभरात नवीन कार डीलर्स नियुक्त करण्याचे प्रयत्न चालू होते. यामध्ये देशभरातील नव्या डिलर्सनी २,००० कोटीहून जास्त गुंतवणूक केली आहे. पण फोर्ड कंपनीचं बंद पडल्याने डिलर्सना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. अमेरिकन कार कंपनी फोर्ड मोटर्स भारतातील कार उत्पादन कायमस्वरूपी बंद करनार असून जून २०२२ पर्यंत भारतिय मार्केटमधून पूर्णपणे बाहेर पडणार आहे. यामुळे जवळपास ५५००० हजार भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.

फोर्ड कंपनीची भारतात अपयशी होण्याची कारणे:
भरमसाठ टॅक्स: भारतीय सरकारकडून परदेशी कार कंपन्याच्या उत्पादन आणि विक्रीवरील टॅक्स हा नेहमीच डोकेदुखीचा विषय राहिला आहे.
कमकुवत मार्केटिंग: फोर्ड फिगो, इकोस्पोर्ट् सारखी समाधानकारक विक्री होणाऱ्या कार असतानासुद्धा अयोग्य मार्केटिंगमुळे ग्राहकापर्यंत पोहचू न शकल्याने मंदावलेली कारची विक्री.
फसलेली गुंतवणूक: ३४०,००० कार उत्पादन क्षमता असलेल्या चेन्नई कारखान्याचा पुरेपूर वापर न करता फोर्डने सानंद येथे ७००० हजार करोड खर्च करत दुसरा प्लांट उभारला. पण कारचे उत्पादनच घटल्याने या गुंतवणुकीत त्यांना भारी नुकसान सहन करावे लागले.
अमेरिकन आणि भारतीय मार्केटमधील फरक: तज्ञांच्या मते फोर्डला भारतीय आणि अमेरिकन मार्केटमधील फरक ओळखता आला नाही. अमेरिकन ग्राहक कार खरेदी करताना कारचे डिझाईन आणि इंजिन पॉवर या गोष्टींवर लक्ष देतो. तर भारतीय ग्राहक कारची कमी किंमत, मायलेज या गोष्टीचा विचार करतो. या बाबतीत फोर्डला मारुती सुझुकी आणि ह्युंदाई कडून सपशेल पराभव पत्करावा लागला.

फोर्डच चुकीचं धोरण सोप्या शब्दात सांगताना एक तज्ञ म्हणले आहे होते की, भारतीयांनी अमेरिकन पिझ्झा आणि बर्गर आनंदाने स्वीकारले, फोर्डला वाटलं ते अमेरिकन कारही स्वीकारतील..पण भारतीयांनी फोर्डच्या कार नाकारल्या.

फोर्ड कंपनीने भारतात लाँच केलेल्या कार आणि त्याचे मायलेज.

पाच वर्षात सहा ऑटो कंपन्यांची भारतातून एक्झिट.
आधीच असलेली आर्थिक मंदी आणि त्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले कोरोना विषाणूचे थैमान यामुळे भारतीय मार्केटमध्ये कार आणि बाइक्सची विक्री मंदावली आहे. यामुळे झालेला तोटा भरून काढता न आल्याने गेल्या पाच वर्षात भारतातून सहा परदेशी ऑटो कंपन्या बाहेर पडल्या आहेत.
हार्ले डेव्हिडसन – सप्टेंबर २०२०, फियाट – मार्च २०१९, जनरल मोटर्स – डिसेंबर २०१७, आयशर पोलारिस – मार्च २०१८, युएम मोटरसायकल्स – ऑक्टोबर २०१९.

लाखो भारतीयांनी गमावल्या नोकऱ्या.
अरबो रुपयांची बँक बॅलन्स, गुंतवणूक, इन्शुरन्स असलेल्या या कंपन्या कदाचित या मंदीतून तग धरून वाट काढू शकतील. पण ह्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपास लाखभर भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. कोरोनाकाळात ह्या सामान्य भारतीयांना आणि त्यांच्या कुटुंबाना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

भारताच्या मेक इन इंडिया आणि जगाचे कार उत्पादन केंद्र बनण्याच्या स्वप्नाला तडा.
जगभरातील ऑटो कंपन्यांनी भारतात उत्पादन कारखाने उभारण्यासाठी मेक इन इंडिया अतंर्गत भारत सरकार अनेक योजना राबवत आहेत. परंतु तरीही अनेक ऑटो कंपन्या भारत देशातून बाहेर पडत असल्याने लाखो भारतीयांचे रोजगार वाचवण्यासाठी सरकारला या बाबतीत जलदगतीने योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे. २०२० पर्यंत भारत देश जगातील चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकाचे कार मार्केट बनणार असल्याचे अंदाज तद्यांनी व्यक्त केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून भारतातील कार मार्केटचा आलेख खालावत जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here