Home latest News अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद,”दरोड्याला” सुरवात* *तालुका महसूल प्रशासनाचे “कागदीघोडे” हास्यास्पद…!

अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद,”दरोड्याला” सुरवात* *तालुका महसूल प्रशासनाचे “कागदीघोडे” हास्यास्पद…!

67

*अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद,”दरोड्याला” सुरवात*

*तालुका महसूल प्रशासनाचे “कागदीघोडे” हास्यास्पद…!

अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद,"दरोड्याला" सुरवात* *तालुका महसूल प्रशासनाचे "कागदीघोडे" हास्यास्पद...!
अर्हेर रेतीघाटावरून भुरटे तस्कर बाद,”दरोड्याला” सुरवात*
*तालुका महसूल प्रशासनाचे “कागदीघोडे” हास्यास्पद…!

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :-
तालुक्यात रेती तस्करीसाठी नंदनवन ठरलेल्या अर्हेर- नवरगाव घाटातील रेतीची मागणी जिल्ह्याबाहेर वाढल्याने आजपर्यंत ‘एंट्री’तील ट्रॅक्टर द्वारे बिनधास्त होणाऱ्या भुरट्या तस्करीचा प्रकार थांबून, हायवा ट्रक, सहा चक्का,बारा चक्का गाडीने बिनधास्त पणे तस्करी होतं इतर जिल्ह्यात रेती पुरवठा केला जातं असून स्थानिक महसूल प्रशासन आपले अधिकार तस्करांच्या दावणीला बांधल्यागत, बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे.

नवीन महसूल अधिकारी तालुका प्रशासनाला लाभल्याने, तालुक्यात रेती तस्करीला आळा बसणार या आशेवर सामान्य नागरीक होते तर काही राजकीय पक्षांनी सुद्धा तस्करीला लगाम लागावे म्हणून प्रशासनाला निवेदन दिलेत मात्र “नवा गडी नवा डाव” नियमावली प्रमाणे पैस्याचा मोह आवरणे कठीण” या उक्तीनुसार तस्करीला कुठलाही प्रतिबंध नागरिकांना, महसूल प्रशासना कडून बघायला मिळाला नाही तर काही राजकीय पक्षाच्या निवेदनाचे संदर्भ देऊन एका शासकीय आदेशानुसार तस्करीला लगाम घ्यालण्याचा फर्मान येताच भुरट्या चोऱ्या बंद होऊन “दरोड्याला” प्रारंभ झाल्याने तालुक्यातील नागरीक त्या “कागदीघोड्या” मागील रहस्य शोधत,चौका-चौकात खमंग चर्चा रंगवीत, रात्रौ च्या सुमारास होणाऱ्या भरधाव जडवाहणाच्या कर्णकश आवाजापासून सुटका मिळविण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासना कडून आसं धरून आहेत.