पायी चालणा-यांना पुर्ण संरक्षण प्रदान करणार- वजीर शेख पो. नि. इंदोरा वाहतुक विभाग.
पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- पोलिस विभागात आपल्या धडाकेबाज कार्यवाहीने अल्पावधित नाव लॊकिक मिळविणारे पो.निरिक्षक मा. वजीर शेख यांची वाहतुक विभागात निरिक्षक पदी नियुक्ति झाली. इंदोरा परिसरातिल सामाजिक कार्यकत्यांच्या वतिने हार्दिक स्वागत करण्यात आले. स्वागतपर भाषणात त्यांनी मनोगत व्यक्त करतांना बोलले की रत्यावर पहिला अधिकार हा पायी चालणा-यांचा आहे त्यांना पुर्ण अधिकार मिळालाच पाहीजे. मी यासाठी प्रयत्न करणार. आपल्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. निवृत्त स.पो.आयुक्त मा. राजरतन बंन्सोड, स.पो.आयुक्त मा. कार्यकर्ते यांच्या उपस्थितित सामाजिक कार्यकत्यांनि शाल, पुष्पगुच्छ देवुन मा. वजिर शेख यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मा. बाळु घरडे यांनी केले.
मा. अनिल मेक्ष्राम, दिनेश अंडरसहारे, बंटी अलेकझांडर, दामु कावरे, छोटुभाऊ इंगळे, राजेश रायपुरे, बबन बंन्सोड, प्रमोद चिचखेडे, भरत लांडगे, यशवंत शेन्डे, विजय पोटपोसे, ऒम अंबादे, प्रमोद शेन्डे, इ. प्रमुख्याने उपस्थित होते.