रामटेक भाजपाचे वीज बिलाचा होळीचे आंदोलन.

नगरधन येथील उपविभाग अभियंता यांचा कार्यालया समोर नारे निर्दशने करून महाविकास सरकारचा निषेध..

वाढीव वीज बिलामुळे सामान्य नागरिक झाले त्रस्त. पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे

मुकेश चौधरी प्रतिनिधी

रामटेक :- नगरधन जिल्हा परिषद क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने 23 नोव्हेंबर ला महाराष्ट्र सरकार मधील शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करुन विजेच्या बिलाचा बोझा सर्व सामान्य नागरिकावर लादत आहे. या निष्क्रिय सरकारच्या विरोधात विजबिलाच्या होळी जाळून तीव्र आंदोलन नगरधन येथील उपविभाग अभियंता यांचा कार्यालया समोर नारे निर्दशने करून महाविकास सरकार चा निषेध नोंदवण्यात आला.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य तथा  भाजपा तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे  जिल्हा महामंत्री राहुल किरपान, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे,जिल्हा भाजप मंत्री अनिल कोल्हे, नगरसेवक संजय बिसमोगरे,भाजप तालुका महामंत्री राजेश जयस्वाल, तालुका भाजप महामंत्री नंदकिशोर कोहळे, महामंत्री चरणसिंग यादव,कार्यालयीन मंत्री धनंजय तरारे , भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका महामंत्री योगेश मात्रे, अश्विन कावळे,सुभाष बावनकुळे, प्रेमदास सायरे, रतन बीरणवार, निलेश हटवार, बाल्या हटवार, रामेश्वर दमाहे, गौरीशंकर गयगये,अनिल नागपुरे, नितेश शेंडे, मोहित दमाहे, सत्यम ठकरेले,राज ठकरेले इत्यादी कार्यकर्ते व गावकरी, संकेत दमाहे, प्रकाश मोहरे, भरत मोहरे इत्यादी 200 कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here