शिवसेनेचे जाळेमुळे अजून घट्ट करणार
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात संघटन वाढविणार
शिवसेनेचे अहेरी विधानसभा
जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची प्रसिद्धी पत्रकातून ग्वाही
मारोती कांबळे
मीडीया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.९४०५७२०५९३
*अहेरी:*- शिवसेना पक्षाचे व राज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे शिवसेने सोबत बंडखोरी केले असले तरी, गडचिरोली जिल्ह्यात किंबहुना अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात कोणताच फरक पडणार नसून उलट नवी उभारी मिळणार असून शिवसेनेचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात जाळेमुळे अजून अधिक घट्ट करणार अशी ग्वाही शिवसेनेचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रियाज शेख यांनी नमूद केले आहे की, हिंदू हृदयसम्राट श्रद्धेय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे राजकारभार उत्तमरीत्या चालवीत असतांना विरोधकांनी डाव साधून सत्तेला आच आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ता परिवर्तन हे निसर्ग नियम असून सत्ता आज आहे, उद्या नाही. पण शिवसेनेचे संघटन व प्राबल्य राज्यात अजून वाढणार असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला अजून बहर येणार असल्याचे ठाम विश्वास पत्रकात रियाज शेख यांनी व्यक्त केले.
प्रामुख्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शना खाली श्रद्धेय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व मुख्यतः शिवसेनेची कार्यप्रणाली सदोदित व अविरत सुरू ठेवणार असून अजून नवी उभारी घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो असल्याचे मत पत्रकात रियाज शेख यांनी व्यक्त केले आहे.
खरे तर शिवसेनेत आमदार, खासदार, मंत्री काही कालावधी पर्यंत अर्थात क्षणिक असतात. पण शिवसैनिक आजन्म असतात , आम्ही शिवसेनेचे पाईक असून शिवसैनिक म्हणून सदैव पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे पाठीशी राहणार असून पक्षात सर्व काही व्यवस्थित सुरू असताना स्वार्थापोटी काहींनी बंड पुकारून राज्याबाहेर गेल्याने अतीमहत्वाच्या बैठका व पक्षाचे ध्येय धोरणे यात सहभाग घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे सुरेंद्रसिंग चंदेल , गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे वासूदेव शेडमाके व अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे मी रियाज शेख असे आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख मुंबई गाठलो असल्याचे पत्रकात शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रीयाज शेख यांनी नमूद केले आहे.