विदर्भ राज्य व्हावे, याकरीता पुनश्च एकदा एल्गार; राजकीय चाणक्य प्रशांत किशोर सह विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची भेट

विदर्भ राज्य व्हावे, याकरीता पुनश्च एकदा एल्गार;
राजकीय चाणक्य प्रशांत किशोर सह विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची भेट

विदर्भ राज्य व्हावे, याकरीता पुनश्च एकदा एल्गार; राजकीय चाणक्य प्रशांत किशोर सह विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची भेट

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

•​नागपूर येथे वेगळ्या विदर्भ राज्यासाठी बैठक संपन्न
•विविध राजकीय नेते व विदर्भवादी नेते उपस्थित

चंद्रपूर, २० सप्टेंबर
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आज (दि.२०) ला नागपूर येथील चिटनविस सेंटर मधे बैठक संपन्न झाली. सदर बैठक ही आशीष देशमुख यांनी आयोजित केलेली होती. यावेळी राजकीय चाणक्य प्रशांत किशोर, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे व इतर विदर्भवादी तथा राजकीय नेते उपस्थित होते. विदर्भ राज्य ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनची मागणी आहे. अखंड महाराष्ट्र राज्यात विदर्भावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात विदर्भाचा अनुशेष वाढत चालला असून आता तो भरून निघण्यासारखा नाही. अनेक नैसर्गिक, भौगोलिक, खनिज संसाधने ही विदर्भ प्रांतात आहे. याचा उपयोग महाराष्ट्रासह देशाला होतो. मात्र त्या तुलनेत विदर्भ प्रांताला म्हणावा तसा फायदा झालेला नाही. शिक्षण, रोजगार, नोकरी, शेती, सिंचन, उद्योग, प्रदूषण, मानवी स्वास्थ्य, वन व वन्यजीव, भौतिक सुविधा आदी बाबतीत अनेक प्रश्न विदर्भात अनुत्तरीत आहेत. अशा सर्व परिस्थितीत वेगळे विदर्भ राज्य होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सदर सभेत विचारमंथन घडून आले. तथा विदर्भ राज्य व्हावे, याकरीता एकजूट करावी, असे आवाहन करण्यात आले. जून २०२३ व डिसेंबर २०२३ अशा दोन टप्प्यात आंदोलनांची स्ट्रेटेजी ठरविल्या जाईल व विदर्भ राज्यासाठी लढा उभारला जाईल, असे या बैठकीत ठरले. या बैठकीने एक नवीन उमेद जागी झाली असल्याचे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here