विद्यार्थ्यांना मार्गदर्शन "एक दिवसीय करिअर गाईडन्स" शिबिर मासुम संस्थेच्यावतीने संपन्न..

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन “एक दिवसीय करिअर गाईडन्स” शिबिर मासुम संस्थेच्यावतीने संपन्न..

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन “एक दिवसीय करिअर गाईडन्स” शिबिर मासुम संस्थेच्यावतीने संपन्न..

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

 

मुंबई – मुंबईतील रात्रशाळांना शैक्षणिक, आर्थिक पाठबळ देणाऱ्या “मासूम संस्था” यांच्या वतीने सायन (पुर्व) विभागातील सातत्याने इयत्ता दहावीचा शंभर टक्के रिझल्ट देणारी सुप्रसिद्ध 

“ज्ञान विकास नाईट हायस्कूल, सायन (पुर्व)” येथे वर्ष २०२१-२०२२ मधील माजी विद्यार्थींसह वर्ष २०२२-२०२३ मधील विद्यार्थी वर्गाला नाईट हायस्कुलमधील दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विशेषतः वयाच्या अठराव्या वर्षांपासून चाळीशी पार केलेल्या परंतु, स्वतः चे कर्तुत्व निर्माण करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

योग्य रित्या स्वतः चे करिअर कसे निवडावे? का निवडावे? त्यातून आपले भविष्य कसे उज्ज्वल करता येईल? यावर आधारित

“एक दिवसीय करिअर गाईडन्स” मासुम संस्थेचे विभागीय प्रतिनिधी ‘आयु. युवराज सर ‘ यांनी सविस्तर रितीने सुटसुटीत रित्या यांनी दिले.

यावेळी मासुम संस्थेचे सह प्रतिनिधी स्मृती पवार मॅडम आणि सुरवसे सर यांच्या सह प्रिन्सीपल परदेशी सर, वर्गशिक्षक फडतरे सर आणि इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणारे सतिश नागमुडे सर हे उपस्थित होते. तर वर्ष २०२१-२०२२ मध्ये दहावी इयत्तेत ७८ टक्केवारी काढून भरघोस गुण मिळवले आणि मासुम संस्थेकडून स्कॉलरशिप व्दारे हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स करत असलेले बौध्दाचार्य जितेंद्र स. कांबळे आणि प्रिया रायपुरे ह्यांच्या सह सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वाचे आभार मानत आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतो आणि आदर्श विद्यार्थी आदर्श नागरिक बनून देश विकसित करून आदर्श बनतो ह्या वाक्याने बौध्दाचार्य जितेंद्र स. कांबळे गुरुजी यांनी समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here