देशात एक दिवस सुध्दा संविधान पूर्णतः लागू झाले, तर देशातील सर्व समाजघटकांचे उत्थान होईल : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो:8830857351

चंद्रपूर: २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होतो. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी समुदायाला घरोघरी गावोगावी संविधान दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यात संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.

शहरात सिव्हील लाईन येथे आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावून सांगण्यात आले. डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, एक दिवस जरी देशात संविधान पूर्णतः लागू झाले तरी या देशातील सर्व समाजघटकांचे उत्थान होईल व देशातील बहुतांश समस्या निकाली लागेल. संविधान हाच जगण्याचा आधार असून देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची क्षमता ठेवते. तेव्हा संविधान दिन हा राष्ट्रीय सण समजून प्रत्येकांनी दरवर्षी असाच घर, कार्यालय, परिसर व समाजातून हा दिवस देशभक्तीच्या भावनेने साजरा करायला हवा.

यावेळी ओबीसी व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. एम. सुभाष, नितीन कुकडे, विजय मालेकर, संजय सपाटे, कविता रंगारी, डॉ. आशीष महातळे, डॉ. कुंदन पाटील, विनायक बोडाले, रविकांत वरारकर, रवि जोगी, वानखेडे, अमर बलकी, गणेश येरगुडे, कन्नाके, माया धमगाये, जोत्सना राजूरकर, मंजुळा डूडूरे, अशोक बुटले, सुरेंद्र अडबाले, देवेंद्र बलकी, सचिन मोहितकर, नरेंद्र धांडे, वैशाली पोडे, हेलवटे, अर्चना काळे, छाया उपगंलावार, पावडे सविता ठावरी, मुप्पावार, संदीप सातपुते, आकाश जुनघरी, स्वप्निल खनके, प्रशांत गाडगे, निळकंठ पायघन, प्रकाश जांभूळकर, योगेश पाचभाई, पी.एस. लांडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here