जेष्ठ पत्रकार श्री. गणेश हिरवे यांच्याकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुस्तके भेट

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो. नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून अनेक अनुयायी येतात. याच दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मुंबईतील काही सामाजिक संस्थांनी आवाहन केले होते की, बाबासाहेबांना अभिवादन करणार तेव्हा एक वही किंवा एक पुस्तक अर्पण करावे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जोगेश्वरी पूर्व येथील जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश हिरवे यांनी पुस्तकं जमा करणाऱ्या अनुयायी पत्रकार पूनम पाटगावे यांना काही पुस्तके भेट स्वरूपात दिली. यावेळी जमा होणारी पुस्तके ही आम्ही विविध ग्रंथालयामध्ये, स्टडी सर्कल मध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून वाचकांना ती वाचता येतील, हाताळता येतील, त्याचा वापर करता येईल असे पूनम पाटगावे म्हणाल्या.

           वाचन संस्कृती जपता यावी यासाठी हिरवे सरांनी आतापर्येंत साधारण चौदा हजाराच्या आसपास पुस्तके विविध वाचनालये, क्रीडा स्पर्धा, विविध संस्था, नातेवाईक व मित्रमंडळी यांना विनामूल्य भेट दिली आहेत. ‘वाचनाने आपल्या ज्ञानात अधिक भर पडते व पुस्तके भेट सुलभ सोपे असून ते देण्याचं समाधान खूप मोठे आहे’, असे हिरवे सर सांगतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली असून ती जपण्यासाठी श्री. गणेश हिरवे सरांनी जोपासलेल्या या छंदाचे विविध वर्गातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here