कविता: गोष्ट आवडत्या सायकलची

गडयांहो एक गोष्ट सांगतो मी खरीखुरी 

बालपणीतल्या सायकलच्या आवडीची 

बालपणी माझ्या घरी असायची सुंदर 

सायकल एका बँक अधिकारी काकाची!

सायकल होती मोठी,चोवीस नंबरची

जिवाच्या मानाने मला ती न पेलायची

मात्र माझ्या अंगात खुमखूमी असायची…

त्या सायकलला चालवून बघण्याची!

एकदा मी मनात,विचारच केला पक्का

आता सायकल वर स्वार होऊन जायचा

पकडली हातात सायकल न निघालो….

अन प्रथम सराव केला कैची शिकण्याचा!

बरेच दिवसानंतर छान चालवायचो कैची 

नंतर एके दिवशी सीटवर स्वार झालो 

पडत -उठत,हात-पायावर जखमा करीत…

शेवटी सायकल चालवायला पूर्ण शिकलो!

मग काय! दिवसभर तिला फिरवायला लागलो 

परिपक्व झाल्याच्या अविर्भावात मिरवू लागलो

अन एके दिवशी रस्त्यात टेबलावर बसलेल्या,

आजोबाच्या अंगावरच थेट सायकल चढवलो!

जखमी आजोबाचा राग तेव्हा अनावर झाला 

त्यांनी सायकल आणि मला पकडले ताकतीने 

डोके फुटून वाहत होता भळभळ रक्त माझा… 

पण हिंमतिने मी तावडीतून सुटलो युक्तीने!

त्या क्षणापासून बरेच दिवस निघून गेले होते 

घरच्यांनी सायकलला हात लावू दिले नाही

कालांतराने त्या काकांनी सायकलला नेले

मात्र आजही त्या सायकलला मी विसरलो नाही!

 

                           – राजेश बारसागडे

                              सावरगाव, चंद्रपूर

                              मो:8830961332

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here