चंद्रपूरकरांच्या 200 युनिट मोफत विजेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार - आ. किशोर जोरगेवार •यंग चांदा ब्रिगेडची अभुतपुर्व अधिकार बाईक रॅली विधानभवनावर धडकली, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चंद्रपूरकरांच्या 200 युनिट मोफत विजेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार – आ. किशोर जोरगेवार

•यंग चांदा ब्रिगेडची अभुतपुर्व अधिकार बाईक रॅली विधानभवनावर धडकली, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चंद्रपूरकरांच्या 200 युनिट मोफत विजेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार - आ. किशोर जोरगेवार •यंग चांदा ब्रिगेडची अभुतपुर्व अधिकार बाईक रॅली विधानभवनावर धडकली, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 26 नोव्हेंबर
चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत देण्यात यावे हि मागणी मी विसरलेलो नाही. ही केवळ मागणी नसुन तो आमचा हक्क आहे. हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो. आजची ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनांच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे. या मागणीसाठी जिवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी असुन, यासाठी मी जेव्हा जेव्हा हाक देईल याच उत्साहात एकत्रित या असे आवाहन आ. जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक दुचाकी ने केला चंद्रपूर ते नागपूर प्रवास

आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः दुचाकी चालवत चंद्रपूर ते नागपूर प्रवास केला. यावेळी सोबत त्यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार होत्या. स्वतः आ. जोरगेवार सपत्नीक दुचाकी चालवत रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतकऱ्यांना विज मोफत देण्यात यावी, रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी या मागणीसाठी आज सोमवारी आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर भव्य अधिकार बाईक रॅली काढण्यात आली. आ. जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर ही भव्य अधिकार बाईक रॅली नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव चे अध्यक्ष अजय जयस्वाल, एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, छोटा नागपूर चे उपसरपंच रिषभ दुपारे,प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, नानाजी नंदनवार, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here