कुभे येथील चोरीला गेलेल्या लोखंडीरॉड सहित माणगांव पोलिसांनी पकडले आरोपीना

कुभे येथील चोरीला गेलेल्या लोखंडीरॉड सहित माणगांव पोलिसांनी पकडले आरोपीना

कुभे येथील चोरीला गेलेल्या लोखंडीरॉड सहित माणगांव पोलिसांनी पकडले आरोपीना

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगाव पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या मौजे कुभे गावच्या हद्दीत अज्ञात इसम यांनी धारिया कन्स्टक्शन मालकीचे लोखंडीरॉड पळवून नेत असल्याच्या निर्द्शनास येत असल्याचे पाहून माणगांव पोलिसांनी अज्ञात इसमाना पकडून रजि न. 358/2022 भादवी कलम 379, 34 हा गुन्हा दिनांक 20/12/2022 रोजी रात्री 00.30 वा. सुमारास मौजे कूंभे गावचे हद्दीत घडला असून दि .21/12/2022 रोजी 18.12 वाजता दाखल आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी ओमकार महादेव शेट्टी, वय वर्ष – 26 रा. रूम नं 304, A विंग, पी जी रेसिडेन्सी महाड, तालुका महाड हे काम करत असलेले धारिया कन्स्ट्रक्शन यांचे मालकीचे मौजे कुंभे धरण येथे चालू असलेले बांधकामाचे 90,000 रुपयाचे 1200 किलो वजनाचे टी एम टी स्टील 32 एम एम व 25 एम एम चे लोखंडी रॉड निळ्या रंगाचे टेम्पोत टाकून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. अशी तक्रार दिल्याने माणगांव पो.नी.श्री. राजेंद्र पाटील माणगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास स. पो.नी.श्री मोहिते, पोसई श्री गायकवाड, पो शि 1361 शिंदे, पो शि 1905 डोईफोडे, पो शि 2220 दहिफळे, पो शि 488 पाटील, पो शि 2221 सगरे यांनी दि 20/12/2022 रोजी पहाटे सदर गुन्ह्यातील निळ्या रंगाचा टेम्पोचा व चोरट्यांचा शोध घेतला असता, सदर निळा रंगाचा टेम्पो व त्यामध्ये असलेले आरोपीत 1.कार्तिक अशोक वाघमारे वय -20 , 2.चेतन अशोक वाघमारे वय – 24 , दोन्ही रा सुकेळी आदिवासीवाडी, ता रोहा, जी रायगड, 3.मारूफ रशीद खान वय – 33 रा पुगाव, ता रोहा, जी रायगड यांना पकडले. सदर गुन्ह्यात 7,00,000 रुपये किमतीचा टाटा कपनीचा टेम्पो क्र एम एच 14 जे एल 2278, त्यामधे असलेले 90,000 रुपयाचे 1280 किलो वजनाचे टी एम टी स्टील 32 एम एम व 25 एम एम चे लोखंडी रॉड, 2000 रुपये किमतीचा एक लोखंड कापायचे गॅस कटर, 10000 रुपये किमतीचे दोन भरलेले ऑक्सिजन सिलेंडर, 6000 रुपये किमतीचा एक निळ्या रंगाचा एच पी कंपनीचा 19 की ग्राम चा एल पी जी गॅस सिलेंडर असा एकूण 08,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. नमूद आरोपींना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आला असून . सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगांव पोलीस हे करीत असून गुन्ह्यातील आणखी पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here