खालापूर तुपगांवात वानरांचा धुमाकूळ,नागरीक त्रस्त ग्रामपंचायतीकडून वन्यप्राणी मित्रांना पाचारण

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-खालापूर ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणआळी परीसरात वानरांनी धुमाकूळ घातल्याने तेथील रहिवाशी त्रस्त झाले होते.येथील वानरांनी एकप्रकारे दहशतच निर्माण केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना व शाळकरी विद्यार्थ्याना नाहक त्रासले होते.विद्याथ्यांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.ब्राम्हण आळी परीसरातून प्रवास करत असताना नागरिक हातात काठी घेऊनच घराबाहेर पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

सदर बाब तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र कुंभार यांना सांगून सदर वानरांचा बंदोबस्त करावा अशी विनंती केली होती.यावर तुपगांव ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र कुंभार , उपसरपंच सुयोग भालेकर ,तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन साखरे, स्वाती जाधव ग्रामपंचायत सदस्य यांनी त्वरित एका खाजगी पुनर्वसन अशा नावाच्या संस्थेला व वन्य प्राणी मित्रांना प्राचारण करून सदर वानरांना पकडुन सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुरू केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच रविंद्र कुंभार, उपसरपंच सुयोग भाळेकर व सदस्यांचे रहिवासी ग्रामस्थांनी आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंचाने हे आभार नसून हे माझे कर्तव्य आहे असे सांगत नागरिकांनी मला थेट सरपंचपदी विराजमान केल्याने त्या़च्या कोणत्याही कामासाठी मी सदैव तत्पर राहिन असे सांगितले. लवकरच येथील वानरांचा बंदोबस्त केला जाईल असे असे सांगून तेथील ग्रामस्थांना रहिवाशांना धीर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here