अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

नागपूर: अखिल भारतीय साहित्य संमेलन पुढील ३,४ आणि ५ तारखेला होवू घातले आहे. या संमेलनाला देशातील बरीच मंडळी हजेरी लावणार असून त्यात विदर्भातील प्रतिभावंतांचा सिंहाचा वाटा आहे. असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारणही तसेच आहे. 

 विदर्भ म्हटलं तर साहित्यीक दृष्टीकोनातून नवरत्नाची खाण. याच भुमीत संत कालिदास होवून गेले आणि याच भुमीत स्वामी मुकूंदराज स्वामी. संत कालिदासांनी मेघदूत आणि शाकुंतल लिहिलं आणि मुकूंदराजांनी विवेकसिंधू नावाचा मराठीतील आद्य ग्रंथ. आज विवेकसिंधूचा जन्म होवून बरीच वर्ष झाली. अलिकडच्या काळाचा विचार केल्यास गझलकार स्व. सुरेश भट याच मातीतील. तसेच ज्यांनी तिफण नावाची कविता लिहिली. ते विठ्ठल वाघही याच मातीतील. तसेच शरदचंद्र मुक्तीबोध जे कवी होते, तेही याच मातीतील. एवढी विदर्भातील माती पावन आहे. यासोबतच ज्यांनी झाडीपट्टीला ख-या अर्थाने न्याय मिळवून दिला, ते डाॅ. हरिश्चंद्र बोरकर याच मातीतील आहेत. त्यांनी दाखवून दिलं की विदर्भातील झाडीपट्टी हाही एक असा भाग आहे की ज्या भागातील भाषा वेगळी असून ती समृद्ध अशी भाषा आहे. त्यांना पाणी बोलता येत नाही तर ते पाण्याला पानी म्हणतात. मग पानी जरी म्हटलं तरी तो प्रमाणीत शब्द आहे. फरक जसा दगड आणि गोट्यात आहे. तोच फरक माणसात आहे. हेच दाखविणारं हे संमेलन. या संमेलनात झाडीपट्टीची बरीच मंडळी निमंत्रीतमध्ये सहभागी आहेत. 

विदर्भाच्या मातीनं केवळ कवीच जन्माला घातले असे नाही तर या मातीनं कादंबरीकारही जन्माला घातले आहे. ज्यांच्या कादंबरीची ग्रीनीच बुकात नोंद व्हावी अशा शुभांगी भडभडे याच मातीतील आहेत. तसेच प्रख्यात कादंबरीकार रविंद्र शोभणेही याच ठिकाणी वास्तव्याला आहेत. याचबरोबर कथाकारांचाही जन्म याच मातीतील आहे. 

या संमेलनातील विशेष गोष्ट अशी की आतापर्यंत अखिल भारतीय स्तरावरील बरीच संमेलनं झाली. त्यात नवोदितांचा भरणा नसायचा. परंतू या संमेलनानं दाखवून दिलं की आम्ही नवोदितांनाही प्रवेश देवू शकतो. कारण या संमेलनाची पत्रीका पाहिली असता असं जाणवतं की ज्यांची जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत वा लिहिली आहेत. त्यांचा या संमेलनात सहभाग दिसत नाही व ज्यांची अल्प पुस्तकं प्रसिद्ध आहेत वा एकही पुस्तक प्रसिद्ध नाही. अशी बरीच मंडळी या संमेलनात निमंत्रीत म्हणून सहभागी आहेत. वारंवार पुनरावृत्ती होणारे प्रस्थापित कवी वा लेखक दोन चार जर सोडले तर जास्त नाही. एवढा कवींचा व लेखकांचा विचार करुन आयोजनकर्त्यांनी निमंत्रीत म्हणून सहभाग केला आहे. आता विषय हा आहे की ज्यांना निमंत्रीत म्हणून संधी मिळाली, ते किती संमेलनाला न्याय मिळवून देतात की गर्वाने फुलून जातात. 

 याबाबतीत मी एक किस्सा सांगतो, एका कवी निमंत्रीत म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी म्हणून सहभागी झाला होता. त्यानं एका स्पर्धेत स्पर्धेसाठी आपली रचना पाठवली. आता प्रत्त्येक स्पर्धेत प्रत्येकाची रचना क्रमांक मिळवेल असे नाही. त्याचा स्पर्धेत क्रमांक आला नाही. त्यावर तो म्हणाला,

            “माझा क्रमांक स्पर्धेत का आला नाही?”

             “नाही आला. ती स्पर्धा आहे. तुमच्यापेक्षा चांगल्या रचना आल्या होत्या स्पर्धेत.”

             “माहीत आहे का? मी अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रतिनिधित्व केलं आहे.”

              हे आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनातील सहभागी लोकांचे हाल. आता यावरुन लक्षात येते की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सहभागी म्हणून समाविष्ट असणारी मंडळी आता यावरुन लक्षात येते की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सहभागी म्हणून समाविष्ट असणारी ही मंडळी वरील प्रकारचे बोलणं बोलण्यानं अखिल भारतीय संमेलनाचा सन्मान वाढवतात की तो सन्मान धुळीस मिळवतात हे त्यांचं त्यांनाच माहित. यावरुन विचार येतो की काही लोकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनात जाण्याची संधी मिळत नाही. मग त्यांचं साहित्य हे गचाळ काय? सत्य सांगायचं झाल्यास त्यांचही साहित्य गचाळ नसतं. तसं कोणीही समजू नये. अशी बरीच मंडळी आहेत की जी अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी झाली नाहीत. परंतू आपल्या साहित्यानं ती मोठी झालीत. 

महत्त्वाचं सांगायचं झाल्यास या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या लोकांनी असं समजून घेवू नये की त्यांचा क्रम अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रीत म्हणून लागला. तसंच उचंबळून जावू नये की आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलन गाजवलं. प्रतिनिधित्व केलं. अहो, या देशात असेही साहित्यीक आहेत की जे तुमच्यापेक्षा बरंच सरस साहित्य लिहितात. परंतू त्यांचा शोध होत नाही आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजन समिती तरी कोणाकोणाला सहभागी करेल! एकशे एक सरस साहित्यीक आहेत देशात. त्यांची रीघ बरीच मोठी आहे. 

  ही आयोजन समिती खरंच चांगली आहे की या संमेलनातून सर्वांना विचारलं गेलं. विदर्भ असो की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असी की खानदेश. हेच नाही तर नवोदित असो की प्रस्थापित. सर्वांना स्थान दिलं या संमेलनानं. ज्यांची वर्णी लागली त्याला आनंद झाला. ज्यांची वर्णी नाही लागली त्यांना दुःख झालं. परंतू दुःख करुन घेवू नका कोणी. कारण अखिल भारतीय साहित्य संमेलनातील आयोजन मंडळालाही मर्यादा आहेत. कोणाकोणाला ते सहभागी करुन घेतील बरे! त्यामुळे आपण स्वतः समाधानी राहिलेलं बरं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here