विकासाची सप्तपदी मांडणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,2 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाकडून उद्योजक, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक अपेक्षा लावून होते. जिल्ह्यातील मान्यवरांनी यावर भिन्न मते व्यक्त केली. बहुतांश लोकांनी अर्थसंकल्प चांगला असल्याचे म्हटले, तर विरोधकांनी त्यावर निराशाजनक प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा | विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे. ‘हम सब एक है’ या | भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे. | विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख | मुद्दांवर केंद्रित ‘सप्तर्षी योजना’ म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प | आहे. फक्त राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळे | देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवित आणि अन्त्योदयाचं पंतप्रधानांनी | पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. | देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचा देखील उचित विचार ह्या अर्थसंकल्पाने केला आहे. संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, | मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here