माणगांव तालुक्यातील पत्रकार आक्रमक राज्य सरकारच्या विरोधात केले निषेध आंदोलन…

✍️सचिन पवार ✍️

कोकण ब्युरो चीफ

📞8080092301📞

रायगड :-पत्रकारचे वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई यांच्या निषेधात राज्यातील पत्रकराच्या अकरा प्रमुख संघटनेशी जोडले गेलेले सर्व पत्रकार यांनी आज प्रत्येक तालुक्यात शहरात निर्दशन करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली आहे. आज दुपारी 12 वाजता माणगांव बस डेपो समोरील माणगांव पोलीस चौकी समोर माणगांव तालुका प्रेस क्लब तसेच प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ माणगांव तालुका याच्या उपस्थितीमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही.. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करतात.

2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.. त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला.. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे.. आज राज्यव्यापी आंदोलनाद्वारे याचा निषेध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here