वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, सी सी टी व्ही व्हिडिओ समोर भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर 

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या,

सी सी टी व्ही व्हिडिओ समोर भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर 

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, सी सी टी व्ही व्हिडिओ समोर भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर 

हिरामण गोरेगावकर

मुंबई :- 25, एप्रिल 2024, वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात आले. वसईतील बिबट्याला पकडण्यात यश आल्यानंतर आता भाईंदरमध्येही बिबट्या मोकाट फिरत असल्याचे समोर आले आहे. एका घरात बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंत, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं बोलल जात आहे. रविवारी पहाटे केशव सृष्टी जवळ खाडी गाव येथे एका घरात बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले आहे. परिसरात बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक जीव मुठीत जगत आहेत. 

मिरा भाईंदर शहरात उत्तन हा निसर्गरम्य परिसर आहे.शहराच्या एका बाजूला संजय गांधी उद्यान असून बिबट्या त्या जंगलातून आल्याचं बोललं जातं आहे.या अगोदर देखील उत्तन परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. तर एका बिबट्याला मागे पकडण्यात वन विभागाला यश आले होते.

मात्र, रविवारी मध्यरात्री स्थानिक नागरिकाच्या घराच्या मागच्या बाजूला बिबट्या शिकारीच्या शोधात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. यावर बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची महिती वनविभागाने दिली आहे. बिबट्या मोकाट फिरत असताना नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन जगत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

वसईतही बिबट्याचा वावर होता
दरम्यान वसईच्या किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले होते .बिबट्या किल्ल्यातील एका भुयारात असल्याचे वनविभागाने शोधून काढले होते .त्या नुसार वनविभागाने ट्रॅप व पिंजरा लावाल होता .मात्र या परिसरात नागरिकांचा वावर असल्याने बिबट्या भुयारातून बाहेर येत नव्हता . अखेर वनविभागाने रो रो फेरी आणि किल्ल्यातील एक रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला . त्यानतंर बिबट्याला पकडण्यात यश आले आणि बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here