Meeting of BJP South (Babupeth) Mandal booth in-charge and Shakti Kendra chief concluded.
Meeting of BJP South (Babupeth) Mandal booth in-charge and Shakti Kendra chief concluded.

भाजपा दक्षिण(बाबूपेठ) मंडळाची बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न.

बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुख यांनी समन्वय साधून कार्य करावे- डॉ.मंगेश गुलवाडे

बूथ प्रमुख हाच पक्षाची खरी ताकद जेष्ठ नेते प्रमोद कडू यांचे प्रतिपादन

Meeting of BJP South (Babupeth) Mandal booth in-charge and Shakti Kendra chief concluded.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगरात बूथ रचना मजबूत करण्याचे कार्य सुरू आहे त्यातीलच दक्षिण मंडळ बाबूपेठ येथे दि.13 मार्च ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुख यांनी समन्वय साधून कार्य केल्यास पक्षाचे संघटन वाढेल व पक्षाची विचारधारा सामान्य माणसापर्यंत सहज पोहचण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू यांनी बूथ प्रभारी व शक्तीकेंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की बूथ प्रमुख हाच पक्षाची खरी ताकद असतो बूथ प्रमुखाला बूथ रचने मध्ये महत्वाचे स्थान असून त्याच्या सुष्म नियोजनाच्या आधारावर पक्षाला कुठल्याही निवडणुकीत यश मिळत असते असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.

सदर बैठकीला भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर बूथ संयोजक तथा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, ज्योतीताई गेडाम, नगरसेवक शाम कनकम, प्रदीप किरमे, भाजपा उपाध्यक्ष गणेश गेडाम, भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, राजेश यादव, दिवाकर पुद्दटवार, रामा भंडारी, दशरथ सोनकुसरे, भाजयुमो मंडळ अध्यक्ष हिमांशू गादेवार, भाजयुमो उपाध्यक्ष कुणाल गुंडावार, मंडळ महामंत्री विवेक शेंडे, आकाश लक्कापुलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here