उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे ऑक्सिजन पूरक बेड उपलब्ध करून द्या: वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद
या मागणीच्या समर्थनार्थ वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदे तर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना निवेदन.
मागणी पूर्ण न झाल्यास वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आंदोलनात सहभागी राहील – अक्षय भास्कर थुटे

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.15मे:- हिंगणघाट समुद्रपुर सिंधी रेल्वे या परिसरात कोरोणाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे दोनशे ऑक्सिजन पुरक बेडची व्यवस्था करण्याबाबत प्रहार संघटनेचे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे ज्यांनी वारंवार जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा केला सोबतच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुद्धा केले. परंतु आज दिनांक:13 मे 2021 पावेतो मागणी पूर्ण झालेली नाही. हिंगणघाट, जाम येथील खाजगी रुग्णालयात मात्र आपणाकडून बेड वाढवीण्याची परवानगी मिळत आहे त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहो. परंतु खासगी रुग्णालयाची फी सामान्य जनतेला न परवडणारी असल्याने सामान्य जनतेला शासकीय रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते व शासकीय रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्याकारणाने त्यांना सेवाग्राम, सावंगी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे हलविण्याची वेळ येते. वर्धा पोहोचेपर्यंत उपचाराला विलंब लागत असल्याने अनेक रुग्णांना आपल्या जीवापासून मुकावे लागते.त्यामुळे हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवीणे अत्यंत गरजेचे आहे.
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद हिंगणघाट विधानसभेच्या वतीने रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्या मागणीला समर्थन जाहीर करण्यात आले. शासनाने व प्रशासनाने मागणीचे गांभीर्य लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे व आठ दिवसाच्या आत शासनाकडून मागणी पूर्ण न झाल्यास प्रहार च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद सहभागी राहील.
अशा प्रकारचे निवेदन संघटनेचे जिल्हा संघटक अक्षय इंगोले तसेच जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव (उत्तर विभाग) व किशोर तांदुळकर (पूर्व विभाग) यांचा नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष अक्षय भास्कर थुटे आणि तालुका अध्यक्ष दिनेश काटकर यांनी ई-मेल च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री तथा आरोग्यमंत्र्यांना दिले.