राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार समारंभ व सदिच्छा भेट.

वर्धा:- लोकसभा मतदारसंघातील वरूड- मोर्शी विधानसभा मतदार संघातील ममदापूर या गावी नुकतीच ग्राम पंचायत निवडणूक पार पडली.व त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी भरघोस मते मिळवून स्वबळावर एक हाती सत्ता स्थापन केली. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 30 जानेवारी ला नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील फाळके यांच्या हस्ते पार पडला. यावेळेस राष्ट्रवादीचे गणेशजी धोटे, दिपकजी देशमुख, संदिपजी लोखंडे, जयंतजी पाटील, अभिजितजी पाटील, राहुलजी कडू, दिपक आखरे, शेषराव नेहारे, प्रभाकर इंगोले, नारायण वाघाडे, गजानन दंडाळे, नामदेवजी कोलमकर, अनिल शेळके, अरूनरव बरबट, अमोल बडोदे, गोपाळ वानखेडे, दादाराव नेहारे, श्रीरंग कानफोडे, भोला निंबाळकर, पंकज फुले, बबन टेकाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.