हिंगणघाटच्या बेसहारा आजीला साथ फाउंडेशनची हक्काची साथ.

53

हिंगणघाटच्या बेसहारा आजीला साथ फाउंडेशनची हक्काची साथ.

The rightful support of Saath Foundation to the helpless grandmother of Hinganghat.
The rightful support of Saath Foundation to the helpless grandmother of Hinganghat.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- ज्या माऊलीने चार मुलांना जन्म दिलाय ते मुलेच तिचा सांभाळ करत नसतील तर अशे मुले असून काय फायदा. BSC तृतीय वर्षाच शिक्षण घेणाऱ्या पल्लवी ला आजी बेसहारा असल्याचे निदर्शनास आले असता, पल्लवी नी सोशल मिडिया च्या माध्यमातून माझा नंबर शोधून आजीची माहिती ज्ञात करून दिली.

हिंगणघाट येथील 60 वर्षीय आजीला 2 मुले, 2 मुली असुन सुद्धा तिला दुसऱ्यांन समोर हात पसरावे लागतात हे बघून मनाला वाईट वाटतं. आज आजीला पुनर्जन्म आश्रम येथे हक्काचं छत साथ फाउंडेशन च्या माध्यमातून देण्याचा योग आला. आजीचे समोरील जीवन पुनर्जन्म आश्रम येथे आनंदात कसे जातील हाच माझा प्रयत्न राहील. या समाजात जीवन जगत असतांना या समाजाला काही देणं आहे याचं भावनेतून साथ फाउंडेशन काम करीत आहे. असेच बेघर, निराधार व्यक्ती आपल्या निदर्शनास आल्यास नक्की कळवा. प्रयाग डोंगरे 7249090906 साथ फाउंडेशन