महासमाधी महास्तूपात व्हिएतनामी भदंतांना श्रद्धांजली
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/पवनी:- जगभरात प्रसिद्ध असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध भिक्खू भदंत थिक न्हात हान्ह यांचे नुकतेच दुखःद निधन झाले.त्यांना पय्या मेत्ता संघातर्फे रूयाळ,पवनी येथील महासमाधी महास्तुप येथे विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध भिक्खू भदंत थिक न्हात हान्ह हे मुळचे व्हिएतनामचे असून ते अमेरिकेत स्थायिक झाले होते व त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले होते.
भदंत थिक न्हात हे बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित व विद्वान भिक्खू असून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.जगभरात ते बुद्धिस्ट स्कॉलर म्हणून प्रसिद्ध होते.त्यांचे वयाच्या पंच्यान्नव्या वर्षी अमेरिकेत निर्वाण झाले.
अशा सुप्रसिद्ध बौद्ध भदंताचार्याला महासमाधी महास्तूपात धम्मदूत भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या श्रद्धांजली सभेत आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी भदंत संघरत्न मानके यांनी भदंत थिक न्हात यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी भदंत धम्मशिखर, ॲड. महेंद्र गोस्वामी,धम्मानंद मेश्राम,बर्फातील ज्वालाचे संपादक मनोहर पंत मेश्राम,असित बागडे,लोमेश सुर्यवंशी,देवा वानखेडे,आनंदविलास रामटेके, डॉ.प्रवीण थुलकर, कैलास गेडाम,टी.जी.रंगारी, अरविंद रामटेके, सत्यवान मेश्राम, कांताबाई दहिवले,धनंजय तिरपुडे उपस्थित होते.
या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम यांनी केले. तर आभारप्रदर्शन ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी केले.याप्रसंगी उपस्थित उपासकांना धम्मदूत भदंत संघरत्न मानके यांनी धम्मोपदेश दिला.