८ फरवरी महासमाधीभूमी धमोत्सव कार्यक्रम रद्द
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/पवनी:-पय्या मेत्ता संघाद्वारा आयोजित रुयाड/सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तूपाच्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होणारा आंतरराष्ट्रीय धमोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सदर निर्णय पय्या मेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न माणके यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दरवर्षी दिनांक ८ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय धमोत्सवाचे आयोजन महा समाधी भूमी रुयाड येथे केले जाते. मार्च 2019 पासून कोरोना महामारीचे थैमान संपूर्ण देशात असल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या नियमाचे पालन काटेकोरपणे व्हावे म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. महासमाधीभूमी सोबत जुळलेल्या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक धम्मदूत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी भदंत धम्मशिखर, एड. महेंद्र गोस्वामी, रमेश सूर्यवंशी, धनंजय तिरपुडे, असित बागडे, कैलास गेडाम, डी. जे. रंगारी, डॉ. प्रविण थुलकर, मनोहर मेश्राम, गजभिये, विलास रामटेके, देवा वानखेडे, सत्यवान मेश्राम, अरविंद रामटेके, कांताबाई दहिवले इत्यादी उपस्थित होते.