पवनीत अवतरले महात्मा गांधी
स्मृतीदिनी राष्ट्रीय एकात्मता रॅलीचे आयोजन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/पवनी:-महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देतांना देशवासियांसाठी दिलेले बलिदान अविस्मरणीय असून त्यांच्या कार्यसिद्धीचा आलेख आठवणीत असावा म्हणून गांधीजींच्या वेशभूषेत बालक अवतरल्याने राष्ट्रीय एकात्मता रॅलीचे आयोजन कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सदर रॅलीची सुरुवात गांधी चौकात स्मृती दिन कार्यक्रम घेऊन करण्यात आली.
तालुका कांग्रेस कमिटी द्वारा आयोजित केलेल्या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे, कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विकास राऊत, महिला महासचिव माधुरी तलमले, डॉ. प्रकाश देशकर, अशफाक पटेल, मच्छिमार कांग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पचारे, मिराताई उरकुडकर, माजी न प उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, जिल्हा उपाध्यक्ष धर्मेंद्र नंदरधने, वंदना नंदागवळी, नत्थू हटवार, युवक कांग्रेस अध्यक्ष अनिकेत गभने, तुशार भोगे, चेतन हेडाऊ, अक्षत नंदरधने, अवनती राऊत, गोपाल नंदरधने, माणिक ब्राह्मणकर, ताराबाई नागपुरे, सोनकुसरे, डॉ. विकास बावनकुळे, शशिकांत भोगे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान बालक व युवकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पोशाखाची हुबेहूब प्रतिकृती करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यात अक्षत नंदरधने, रुद्र दडवे व जागेश्वर पचारे या बालकांचा समावेश होता. कार्यक्रमात महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेल्या त्यागावर भाष्य केले. पवनीच्या प्रमुख मार्गाने एकात्मता रॅली फिरवण्यात आली.








