ग्लोबल वादक अवतरले जोगेश्वरीच्या बालविकास शाळेच्या प्रांगणात

52

ग्लोबल वादक अवतरले जोगेश्वरीच्या बालविकास शाळेच्या प्रांगणात

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

जोगेश्वरी :- प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही सामाजिक बांधिलकी जपणा-या द ग्लोबल कल्चर चॕम्पिअन ॲवाॕर्ड विजेत्या सुप्रसिद्ध भारतीय व्हायोलिन वादक सुनिता भुयान यांनी मुख्य मार्गदर्शक या भुमिकेतून एटीओएस प्रयास फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व ) शाळेला त्यांचे सहकारी दिप्ती बंदीसोडे, नवनित एज्युकेशन लिमिटेड चे रूमी मेस्त्री यांच्या सोबत सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी त्यांना सन्मानित केले.

      कलेच्या उपासक सुनिता भुयान यांनी शारदेच्या मंदिरात विद्यार्थ्यां सोबत मनसोक्त संवाद साधला.

त्यांच्या मितभाषी संवाद कौशल्याने विद्यार्थ्यां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार म्हणून त्यांनी शाळेला आधुनिक डिजिटल शैक्षणिक साहित्य भेट दिले. त्याप्रसंगी संस्थेचे उपकार्याध्यक्ष सहदेव सावंत, प्रशासकीय अधिकारी अशोक परब, मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे, पर्यवेक्षक जगदीश सूर्यवंशी, अधिवेशन प्रमुख राजेंद्र निळे व शिक्षक उपस्थित होते.