शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करा- शेतकरी नेते सुनील देवरे

30

शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करा- शेतकरी नेते सुनील देवरे

शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करा- शेतकरी नेते सुनील देवरे
शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करा- शेतकरी नेते सुनील देवरे

 

✍️ *निलेश सोनवणे*✍️
*जळगांव तालुका प्रतिनिधी*
मो. :-9922783478

*जळगांव* :- सविस्तर वृत्त असे की, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा आम्ही सत्तेत आल्यानंतर कोरा करून देऊ. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. परंतु आता सत्तेत आल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून त्यांनी सातबारा कोरा करण्याची इच्छा व्यक्त केलेली दिसत नाही.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही सांगितले की आपण माझ्या भाषणात कुठे कर्जमाफीचा उल्लेख केलेला नाही ? असे सांगितले म्हणजेच फक्त मतांचे राजकारण करून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करण्यात आलेली दिसून येत आहे.तरी या रास्ता रोको आंदोलनाची शासनाने दखल घेऊन सरसकट कर्जमाफी करावी,कापसाला दहा हजार रुपये हमीभाव द्यावा, बंद केंद्र व नवीन भडगाव तालुक्यात सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, तसेच तालुक्यातील सट्टा,मटका, गांजा, भांग,वाळू असे अवैध्य धंदे बंद करून शेतकऱ्यांचे मुलं या वाम मार्गापासून दूर ठेवावेत अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी रस्ता रोको आंदोलनाच्या वेळी केले. या आंदोलनाचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे. यावेळी रस्ता रोखल्याने चाळीसगाव, पाचोरा,पारोळा या रस्त्यावरील चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनामध्ये भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, सोबतच तालुक्यातील शाखा,तालुका कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी सह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने यावर नजर ठेवत चोख बंदोबस्त ठेवत यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली.