बीअर शॉपी बाहेरच, रंगते तळीरामांची मैफिल, पोलीस प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष:
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞
मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे एक वाईन शॉप, व एक बीअर शॉप असून तिथे तळीरामांची दारू पिण्यास मोठी झुंबड नेहमी पाहवयास मिळते. प्रेम नगर मोठ्या उचभ्रू सोसायटी आणि स्लम एरिया असून तिथे राहणारे नागरिक सुसूक्षित आणि मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग असून तिथून त्यांचं दररोज ये -जा करत असतात, त्यामध्ये ह्या तळीरामांचा सकाळ पासून ते रात्री वाईन शॉप बंद होईपर्यंत त्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो.
तिथून जाणाऱ्या महिलांचा पण मोठा वर्ग आहे, त्यांना अक्षर्ष त्यांना बघून यायला जायला लाज वाटते, अशा मधे शाळेत जाणारे लहान मुलांना सुद्धा त्याच रोड वरून जावे लागते, जर असे चित्र पाहून मुलांच्या डोक्यावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची जाणीव तिथल्या पोलीस प्रशासनाला कदाचित नसावी, असा प्रश्न नेहमी तिथे राहणाऱ्या रहिवाशांना पडत असावा.
पोलीस प्रशासन वाईन शॉप वाल्यांपुढे हतबल झालेले पाहवयास मिळते. वाईन शॉप वाल्यांवर पोलिसांची कधीच अशा बाबतीत कारवाई झालेली पाहायला मिळाली नाही. पोलीस रोज तिथून ये -जा करत असतात पण या परिस्थिवर त्यांना काहीच पडलं नाही, हे आश्चर्य करण्यासारखे आहे. वाईन शॉप वाल्यांकडून पोलिसांवर कुठला एवढा दबाव आहे, कि ते तिथेच मधपान करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. कि वाईन शॉप वाल्यांकडून तिथेच मधपान करण्याचा जणू परमिटच मिळाला आहे.
अतिशय भयंकर असं चित्र दररोज वाईन शॉप बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बघायला मिळते. आणि मुजोर झालेले तळीराम तिथेच अश्लील भाषेत शिवीगाळ करणं, तिथेच त्यांची पिण्याच्या वादावरून भांडण होणे, अशा सर्व प्रकाराला प्रेम नगरचे रहिवासी अक्सर्श कंटाळलेली पाहायला मिळते, कारण त्यांना धाकच कुणाचा राहिला नाही, धाकच नसेल तर असे उधोग करणं त्यांना नवीन नाही.वाईन शॉप आणि बीअर बार यातला आता फरक पोलिसांनी समजून सांगण्याची वेळ आता रहिवाशांवर आली आहे.
असंच जर चालू राहिलं तर गुन्हेगारी मधे वाढ होण्यास वावगं ठरणार नाही. भर दिवसा महिलेची छेड ही काढली जाईल, तळीरामांचा काय भरवसा ते काहीही करू शकतात आणि या सर्व घटनेला आपलं लाडकं पोलीस प्रशासन जवाबदार असू शकतात, जर वेळीच या सर्व प्रकारावर गांभीर्याने जर नाही लक्ष दिले तर अनेक घटना तिथे घडू शकतात, जर अशा घटना टाळायच्या असतील तर वेळीच तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने सर्व प्रकारची दखल घेऊन तिथल्या वाईन शॉप मालकांवर कारवाई केली पाहिजे. अशी मांगणी प्रेम नगर रहिवानशांची आहे.