सेल्फीच्या नादात नदीत बोट उलटून बाप-लेकाचा मृत्यू , मायलेकींना वाचवण्यात यश.

51

सेल्फीच्या नादात नदीत बोट उलटून बाप-लेकाचा मृत्यू , मायलेकींना वाचवण्यात यश.

Baap-leka dies after boat capsizes in river
Baap-leka dies after boat capsizes in river

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी✒
सोलापूर,01 मार्च:- सेल्फीच्या नादात बोट उलटून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून उजनी नदीपात्रात बोटीतून फिरताना ही दुर्दैवी घटना घडली असून बोट उलटल्यानंतर मायलेकींना वाचवण्यात यश आलं आहे, परंतु बापलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

सोलापूरातील राहणारे शेंडगे परिवार रविवारी संध्याकाळी उजनी पात्रात बोटीतून फिरण्यास निघाले होते.  नदीच्या किनार्‍यापासून बोट 300 मीटर अंतरावर गेल्यानंतर सर्वांना सेल्फीचा मोह आवरला नाही. यावेळी बोटीत एकत्रितपणे सर्वांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सेल्फी काढत असताना नदीच्या पाण्यात बोट उलटली. सेल्फी काढत असताना सर्वांचा तोल गेल्याने बोट पाण्यात उलटली आणि शेंडगे कुटुंबीयांसह बोटीतील इतर प्रवासीही पाण्यात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पत्नी स्वाती शेंडगे, मुलगी अंजली विकास शेंडगे यांच्यासह अन्य चार जणांना पाण्यात बुडण्यापासून बचावले. या घटनेमुळे शेंडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.