मुंबईत हत्येचे सत्र सुरूच; वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या.

57

मुंबईत हत्येचे सत्र सुरूच; वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या.

Murder season continues in Mumbai; An elderly woman was brutally stabbed to death with a sharp weapon.
Murder season continues in Mumbai; An elderly woman was brutally stabbed to death with a sharp weapon.

राजू मोरे प्रतिनिधी✒
कल्याण, दि. 28 फेब्रुवारी:- घरामध्ये एकट्याच राहणाऱ्या हंसाबाई ठककर या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. पश्चिमकेडील दत्तआळी परिसरात ही घटना घडली आहे. अनेक वेळा संपर्क करूनही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे नातेवाइकांनी घरी येऊन पाहिले असता, त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.