काळ्या जादूने 50 कोटींचा पाऊस पाडण्याच्या लालसेने, मुलीचे कपडे उतरवून नग्न करण्याचा प्रयत्न.
✒युवराज मेश्राम प्रतिनिधी✒
नागपुर, दि.28 फेब्रुवारी:- महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली एका मुलीला कपडे उतरवून नग्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोक अंधश्रद्धेचा काळ्या जादूच्या लाभाच्या बहाण्याने कुठल्या स्थराला जाऊ शकते हा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे.
नागपुर मधिल एका मुलीला 50 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे अमिष काही लोकांनी दाखवले. यासाठी त्यांनी या मुलीचे कपडे उतरवून नग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कृत्य त्या लोकांना चांगले महागात पडले आणि आता हे पाचही लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. या मुलीने आयत्या वेळी प्रसंगावधान दाखवले नसते तर कोणतीही अप्रिय घटना घडू शकली असती.
प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिला एक इसम मिळाला होता ज्याने तिला कोरोडपती होण्याचे मोठ स्वप्न दाखवले आणि त्यासाठी काही अटी तिच्यासमोर ठेवल्या. त्याने तिला सांगितले की जर तिने या अटी पूर्ण केल्या तर ती लवकर कोरोडपती होईल आणि काळ्या जादूद्वारे आकाशातून 50 कोटी रुपयांचा पाऊस पडेल. यानंतर ही मुलगी त्याच्या जाळ्यात अडकली, विकी गणेश खपरे वय 20 वर्ष, दिनेश महादेव निखरे वय 25 वर्ष, रामकृष्ण दादाजी म्हास्कर वय 41 वर्ष, विनोद जयराम मसराम वय42 वर्ष और डीआर उर्फ सोपान हरिभाऊ कुमरे वय 35 वर्ष या संशयित आरोपीने जेव्हा या मुलीला तिचे कपडे उतरवण्यास सांगितले तेव्हा तिला काहीसा संशय आला. हे आरोपी सातत्याने तिच्यावर नग्न निर्वस्त्र होण्यासाठी दबाव टाकत राहिले, मात्र तिने नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासचक्र फिरवली.
पीडितेने सतत दुर्लक्ष्य करूनही हे संशयित आरोपी त्या मुलीवर सतत दबाव टाकत राहिले ज्यानंतर तिने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. लकडगंज पोलिसांनी तपासाला सुरुवात करत 5 आरोपींना अटक केली ज्यांच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायदा, पॉक्सो आणि इतर कायदे आणि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.