देवपायली येथे माता मानकादेवी देवस्थान परिसर सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन संपन्न. आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते भुमीपुजन

देवपायली येथे माता मानकादेवी देवस्थान परिसर सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन संपन्न.

आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते भुमीपुजन

देवपायली येथे माता मानकादेवी देवस्थान परिसर सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन संपन्न. आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते भुमीपुजन

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड- मा, आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते जि.प. बांधकाम जिल्हा निधी N-27 अंतर्गत नागभीड तालुक्यातील देवपायली येथे माता मानकादेवी देवस्थान परिसर सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची उपस्थिती होती .
देवपायली येथील माता मानकादेवी ही नवसाला पावणारी गेली म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असुन मोठ्या प्रमाणावर भाविक श्रध्दाळु येथे नवस फेडायला येत असतात. वर्षाच येणाऱ्या दोन्ही नवरात्र उत्सवात मंदिर कमेटीतर्फे होणाऱ्या कार्यक्रमात भाविकांची प्रचंड गर्दी असते. आम. बंटीभाऊ भांगडिया यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध केल्याने भव्य मंदिर व पाकशाळा उपलब्ध झालेले आहे . तर जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी या मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी जि.प.बांधकाम सभापती राजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातुन जिल्हा निधीतून निधी मंजुर करुन घेतले . याचे भुमीपुजन नुकतेच उत्साहात करण्यात आले . आम.बंटीभाऊ भांगडिया व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी यासाठी दिलेला शब्द पुर्ण केल्याने देवस्थान कमेटी व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत .
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुरकर , भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, सभापती कृ.ऊ.बा. समिती आवेश पठाण, उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड , सचिन आकुलवार, रामचंद्र पाटील नवघडे ज्येष्ठ कार्यकर्ते , सौ अर्चना ठाकरे सरपंच ग्रा.पं. देवपायली , इंदिराबाईं नवघडे उपसरपंच देवपायली , राजेश्वर गुरपुडे बूथ अध्यक्ष , लक्ष्मण कोहपरे माजी सरपंच,देवपायली , बाळापूर-पारडी जि.प. सर्कल प्रमुख धनराज बावनकर, भोजराज नवघडे पंचायत समिती प्रमुख , सौ पुष्पमाला संतोष जनबंधू उपसरपंच बाळापुर , सुनीलभाऊ नवघडे , आनंद भरडकर, शैलेश मोहुरले ग्रामपंचायत सदस्य बाळापुर, रामप्रसाद कुंभरे ग्रामपंचायत सदस्य , विलास मोहुरले संचालक बाळापुर , चरणदास मासुरकर संचालक बाळापुर , मोरेश्वर नवघडे सदस्य देवपायली , शामराव कोहपरे श्री धनपाल नवघडे , दयाराम खेवले , राजेश्वर खुडशिंगे इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.