भांडुप येथे वपोनि व सपोनि यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा २०२२ उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न

भांडुप येथे वपोनि व सपोनि यांच्या उपस्थितीत
पारितोषिक वितरण सोहळा २०२२
उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न

भांडुप येथे वपोनि व सपोनि यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा २०२२ उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई – ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलेपमेंट यांच्या विद्यमाने तसेच Free Press Journal आणि दैनिक नवशक्ती यांच्या सहकार्याने रविवार दि. २३ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ८८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेस मुंबई, महाराष्ट्रासह, राज्याबाहेरून ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रमुख मार्गदर्शक मा. नितीन उन्हवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भांडुप पोलीस ठाणे, तसेच मा. विशाल वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई याच्या प्रमुख उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात नितीन उन्हवणे सर, विशाल वाघमारे सर, यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन केले व तद्नंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून पुढील कार्यक्रमास सुरू केली.
विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिक वितरण सोहळ्याचा आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले तसेच अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने व देशपातळीवर प्लेटफॉर्म राबवण्याची विनंती केली.

खुला गट स्पर्धचे प्रथम क्रमांक विजेते ठरलेले दिगंबर वारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत या स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली. संविधान हे लोकांपर्यत पोचले पाहिजे, स्पर्धेत भाग ही घेतला पाहिजे, संविधानांची तत्त्वे वाचले पाहिजेत त्यासोबत ती अंगिकारली पाहिजे यासाठी आयोजक गेल्या ४ वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहे हे मी प्रत्यक्ष डोळ्यांने पाहिले आहे.
त्यांनतर मा. विशाल वाघमारे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आपल्या पाल्याला आयएएस, आयपीएस बनवण्याचे ध्येय ठेवण्यासाठी प्रेरित केले तसेच विजेत्या स्पर्धेचे अभिनंदन केले.

त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक मा. नितीन उन्हवणे सर, वरिष्ठ पोलीस ठाणे, भांडुप पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन करत विजेते स्पर्धक, विद्यार्थां व पालक यांचे अभिनंदन केले. माझ्या संपूर्ण सर्व्हिस, आयुष्यामधे असा हा अभ्यासपूर्ण व मुलांचे प्रबोधनात्मक करणारा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला असे सांगत आयोजकांचे कौतुक केले. राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे च नाही संपूर्ण संविधानावर आपण काम केले पाहिजे व ते सातत्याने सुरु ठेवण्याची सूचना केली. त्यासोबत विद्यार्थी सोशल मिडियाचा वापर कसा करतात, त्यांसदर्भात त्याचे होणारे गंभीर परिणाम व वापरांसदर्भात लक्ष वेधले. अहमदनगर मधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थीं, पालक व स्पर्धक उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनपर कौतुक केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे, तसेच स्थानिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी, नागरिक व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंटच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

तसेच अरुणा सावंत आणि राजश्री पवार यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि अल्पोपहार दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

…………………..…………………….
सर्व विजेत्या स्पर्धकांचे नावे

निकाल(Result)

पहिला गट ( ३री ते ६ वी)

🥇प्रथम क्रमांक🥇: पाखी झळके ( खारगर)
🥈द्वितीय क्रमांक 🥈: आर्या तेलगे (पनवेल)
🥉तृतीय क्रमांक🥉 : अर्णव हंडोरे(अहमदनगर)

उत्तेजनार्थ पहिला गट:

▶ प्राची नवगिरे (भांडुप)
▶ अस्मिता पुंड(अहमदनगर)
▶ प्रसाद गहिले (अहमदनगर)
▶ सार्थक खंडागळे(अहमदनगर)
▶ सोनम चौहान(अहमदनगर)
▶ विराज माळवदे (अहमदनगर)
▶ युक्ता गवई (आंबेठान)

दुसरा गट ( ७वी ते १०वी)

🥇प्रथम क्रमांक🥇: निशा जाधव ( रत्नागिरी)
🥈द्वितीय क्रमांक 🥈:भाग्यश्री चंद (पुणे)
🥉तृतीय क्रमांक🥉 : प्राजक्ता परब (भांडुप)

उत्तेजनार्थ दुसरा गट:

▶ अंजली घुगे (उस्मानाबाद)
▶ ईश्वरी पिसाळ (ठाणे)
▶ पवित्रा सुर्वे (भांडुप)
▶ आरती भोसले (नवी मुंबई)
▶ प्रांजल माथणे (विक्रोळी)
▶ प्राची चौरसिया (मुंबई)
▶ समिक्षा काटरणवरे(चेंबूर)

खुला गट

🥇प्रथम क्रमांक🥇: दिगंबर वारे ( भांडुप)
🥈द्वितीय क्रमांक 🥈: रिया नाईक (अंधेरी)
🥉तृतीय क्रमांक🥉 : प्रेरणा कळासरे (वाशिम)

उत्तेजनार्थ खुला गट:

▶ अश्विनी घुगे (उस्मानाबाद)
▶ कस्तुरी इळकर (डोंबिवली)
▶ सोनाली तापकीर (पुणे)
▶ वैष्णवी साबळे (औरंगाबाद)
▶ अनिकेत जाधव (रत्नागिरी)
▶ शाम कांबळे (गोरेगाव)
▶ अविराज गोरीवले (मालाड)
▶ धनराज दुर्योधन (चंद्रपूर)
▶ प्रज्योती गजभिये (अमरावती)
▶ कुलदीप ढोर्लेकर (रत्नागिरी)
▶ मनस्वी कुलये (मालाड)
▶ राखी खानविलकर (ठाणे)
▶ नेत्रा टोपरे (रत्नागिरी)
▶ रुपेश केळकर (मालाड)
▶ विकास नांदिवडेकर (कांजूरमार्ग)

सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन.