रोटी फाउंडेशनचा आधार, दुर्गम भागातील टॅक्सी ड्रायव्हर मुलगी किरणला लंडन येथे उच्च शिक्षणासाठी केली ५ लाखांची मदत

गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते ५ लाखांचा चेक किरणला स्वाधीन.

 महेश बुरमवार

१ मार्च: गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग सिरोंचा तालुक्यातील रेगुंटा येथील टॅक्सी चालक मुलगी किरण कुर्मावार हिला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे जायचे होते, तिथे तिला मोठ्या महाविद्यालयात प्रवेश ही नक्की झाले होते, परंतु तिची हालाखीची परिस्थिती आहे, ती स्वतः आपल्या वडिलांसोबत टॅक्सीत ड्रायव्हरकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे, ह्याही परिस्थितीत तिने उस्मानाबाद इथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे, पुढील शिक्षणासाठी तिला लंडन येथे जायचे आहे परंतु आर्थिक अडचण निर्माण झाल्याने लंडन जायचे कसे ह्या विवंचनेत किरण असल्याबाबतची बातमी एका न्यूज चैनलवर प्रसिद्ध झाली.

ही बातमी बघून रोटी फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. रोहितजी माडेवार यांनी त्वरित मदतीचा हात समोर केला, आणि त्यांनी चौकशी करून अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्याशी संपर्क केला आणि रवी यांनी तिचा संपर्क नंबर शोधून तिच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर काल रेगुंटा येते झालेल्या एका कार्यक्रमात किरणला डॉक्टर मा. रोहितजी माडेवार तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या शुभहस्ते रोटी फाउंडेशन, नागपूर तर्फे ५ लाख रुपयांचा चेक किरणला स्वाधीन करण्यात आले, तिला भविष्यात येणाऱ्या सर्व अडथळे दूर करण्यासाठी समोर ही मदत करण्याचे आश्वासनही ह्यावेळी रोटी फाऊंडेशन, नागपूर तर्फे देण्यात आले.

 ह्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, डॉ रोहित माडेवार, जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के, प्रशांत शेंडे , रवी नेलकुद्री, प्रशांत नामेलवार, राकेश कोसरे, विनोद जिल्लेवार, डॉ तिरुपती कोलावर , डॉ स्नेहल मेक्रतवार, सूचित कोडेलवार, रितिक कुंभारे, अनुराग पिपरे, आकाश तुलसीगिरी, रेगुंटाचे पोलीस स्टेशनचे प्रभारी सानप साहेब, सूचित कोडेलवार , प्रमोद भोयर, संतोष पडलवार, मल्लांना संघरथी , अजयजी मुकेशी व रेगुंटा परिसरतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here