रायगड जिह्यातील नामदार श्री मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर नांदवी शाळेत मध्ये शिकत असलेल्या इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव लोणेरे विभाग प्रतिनिधी.
📞संपर्क-७०२११५८४६०.
रायगड (नांदवी) :- दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नामदार श्री मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर नांदवी या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दुपारी १: ३०वाजत पार पडला…
उपस्थित सगळे वर्ग शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक .आदर्श शिक्षक .श्री पवार सर यांच्या उपस्थितीत पार पडला..निरोप समारंभाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या कु.अनामिका शिर्के तसेच दिशा शिंदे यांनी केले…
ज्या शाळेतून इयत्ता ५ वी पासून ते इयत्ता १० वी पर्यंत सर्व शिक्षकांना गुरू स्थानी ठेऊन आपल्या उज्वल भविष्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले त्याची परत फेड करता येत नाही .परंतु आपली आठवण म्हणून सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भेटवस्तू दिली..तसेच इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या…
तसेच दहावीच्या वर्गातील कु.श्रावणी पूरारकर, मनाली आंबेकर,पायल येलकर,प्रगती गाढवे,कस्तुरी लोखंडे,संजीवनी शिर्के यांनी डोळ्यातील अश्रू आवरत आपलं दहावी पर्यंतच प्रवास सांगितलं…. नंतर शाळेच्या शिक्षकांनी आपले मत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या..श्री माने सर,श्री सुरलकर सर,म्हेत्रे सर,सुर्वे सर,आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार यांनी १० वी बोर्ड परीक्षा व पुढील शिक्षणासाठी गोड शब्द सुमानाने शुभेच्छा दिल्या..
.इयत्ता नववीच्या वर्गाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला…त्याकरता इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले…नंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कू.दिशा शिंदे हिने केले…