म्हसळा येथे इंडिया आघाडीची संयुक्त बैठक..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वानुमते जाहीर पाठिंबा
✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:- दि. २९ फेब्रु रोजी म्हसळा येथे इंडिया आघाडीची संयुक्त बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये आघाडीचे सर्व घटक पक्ष उपस्थित होते, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,शेकाप, वंचित असे इंडिया आघाडीचे म्हसळा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, बैठकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले,
या बैठकीत श्रीवर्धन क्षेत्र संघटक रवींद्र लाड, द. रा. उप. जिल्हा प्रमुख नंदु शिर्के, युवा सेना उप. जि. अधिकारी अमित महामुणकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष मोईज शेख, शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील, युवा सेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, तालुका संघटक बाळा म्हात्रे, शहर प्रमुख विशाल सायकर, हेमंत नाक्ती,एकनाथ खामगावकर, महेंद्र गिजे,सुर्यकांत तांबे,नदीम दफेदार,बाबाजान पठाण, सलिम धनसे, सुहेल फकी,अमानुल्ला शिरशिकर, ऐजाज घरटकर, तसेच सर्व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————-
आम्ही व्यक्तिच्या विरोधात नाही पण जे काही विकास कामांच्या पाठिमागे जनतेची दिशाभूल केली जात आहे त्याला आमचा विरोध असणार आहे, म्हणुनच आमच्या इंडिया आघाडीचे लोकसभा व विधानसभेचे उमेदवार असणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा असुन त्यांना आम्ही नक्कीच विजयी करणार यात काहीच शंका नाही.
डॉ . मोईज शेख.
काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका अध्यक्ष.