अज्ञान मुलांना चोरट्यांनी पळवण्याची शंका.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
उमरेड :- उमरेड परसोळी परिसरात राहत असलेली लिखित उर्फ श्री मधुकर हटवार वय १२ व संजीत रामबच्चन यादव १२ वर्ष ही दोन्ही अल्पवयीन बालके हे बाहेर खेळायला जातो म्हणून घराबाहेर गेले. परंतु बराच वेळ होऊ नये ते परत आले नाही. त्यामुळे या दोन्ही मुलांच्या मुलांना कोणीतरी अज्ञान व्यक्तीस लावून पळवून नेले आहे. अशी शंका मधुकर हटवार यांना आली. त्यांनी अशी तक्रार मधुकर महादेव हटवार वय ५०वर्ष दि.२८ फरवरीला रात्री नऊ वाजता उमट पोलीस ठाण्यात दाखल केली असून याबाबत अज्ञान आरोपीविरुद्ध उमरेड पोलीस सात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मलकुलवार पुढील तपास करीत आहे.