कळमजे ग्रामस्थांसाठी उभारली पाणपोई !
कालभैरव प्रवेशद्वारावर कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबेंच्या हस्ते उद्घाटन
✒️नंदकुमार चांदोरकर✒️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞
माणगाव : होळी उत्सवापूर्वीच उन्हाळा अधिक जाणवू लागण्याने पाण्याने व्याकूळ झालेल्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व थंड पाणी मिळावे यासाठी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी स्वखर्चाने कळमजे फाट्यावरील प्रवेशद्वारावर पाणपोई उभारून त्याचे उद्घाटन सरपंच, उप सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्या उपस्थित पंकज तांबे यांनी श्रीफळ वाढवून केले. त्यामुळे कळमजे ग्रामस्थांनी पंकज तांबे यांचे बोलताना जाहीर आभार व्यक्त केले.
मुंबई – गोवा महामार्गालगत गोद नदीजवळ कळमजे फाटा आहे. या फाट्यावर जगद्गुरु संत तुकराम महाराज, श्री. काळभैरव प्रवेशद्वार उभारले आहे. येथून पुढे कळमजे हे गाव १ कि.मी. अंतरापेक्षा जास्त आहे. या गावात सुमारे १५० पेक्षा जास्त कुटुंब राहत असून या गावाची १२०० लोकवस्ती आहे. मुलांना शिक्षण घेण्यासाठी तसेच येथील नागरिकांना बाजार व दवाखान्यात येण्या-जाण्यासाठी कळमजे फाट्यावर पायपीट करावी लागते. दरम्यानच्या अंतरात कसलीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महिला, वृद्ध नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांना पायी चालल्यामुळे घशाला कोरड पडते. यासाठी पुढील कडक उन्हाळ्याचे तीन महिने पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाणी मिळावे. यासाठी कळमजे ग्रामस्थ मुकुंद वाढवळ व तेथील ग्रामस्थांनी पाणपोईची समस्या पंकज तांबे यांच्याकडे मांडली. उन्हाळ्यात व्याकूळ झालेल्या ग्रामस्थांना पिण्याचे थंड व स्वच्छ पाणी मिळावे. या नागरीकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनी तत्काळ कळमजे फाट्यावर स्वखर्चाने पाणपोई उभारली. त्या पाणपोईचे श्री. तांबे यांनी श्री. काळभैरव प्रवेशद्वारावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केले.
यावेळी माणगाव युवासेना उपतालुका प्रमुख स्वप्नील शिर्के तसेच बामणोली ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र सपकाळ, माजी सरपंच माधुरी वाढवळ, माजी उपसरपंच प्रवीण पाखुर्डे, पोलीस पाटील सुभाष वाढवळ, मुकुंद वाढवळ, विजय वाढवळ, विजय राऊत, अमोल वाढवळ, राज राऊत, राहुल राऊत, अंकित वाढवळ, सुरज वाढवळ, जितेंद्र तेटगुरे, तुषार वाढवळ, अनिल राऊत, मधुकर वाढवळ, दत्ताराम वाढवळ, मंगेश वाढवळ, दिलीप वाढवळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळमजे फाटा येथे ग्रामस्थांना पायपीट करीत ये – जा करावी लागते. तेथे आल्यावर या प्रवाशी नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यामध्ये तहान लागते. त्या परिसरात दुसरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत होती. ही मागणी तत्काळ पूर्ण करीत पंकज तांबे यांनी पाणपोई स्वखर्चाने उभारली असल्याने ग्रामस्थ नागरिकांनी श्री. तांबे यांचे आभार मानले.