बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या

बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली :- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी बोधगया येथे पूजनीय बौद्ध भिक्षूंच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बौद्ध महासभा आणि शहरातील इतर आंबेडकरी संघटनांनी ०१ मार्च रोजी दुपारी विशाल धरणे आंदोलन केले.

शहरातील इंदिरा गांधी चौकात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी आणि बौद्ध महासभेचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी त्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान अनेक भाषणे दिली आणि बोधगया बुद्ध विहारावर बौद्धेतरांकडून नियंत्रण मिळवल्याबद्दल निराशा व्यक्त केली. त्यांनी सदर बुद्ध विहार त्वरित बौद्ध भिक्षूंना सोपवावा अशी जोरदार मागणी केली. सरकारने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींना उद्देशून एक लेखी निवेदन गडचिरोली पोलीस स्टेशन प्रभारी सिंजनगुडे यांना सादर करण्यात आले, त्यांनी ते निवेदन भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयात पाठवण्याचे आश्वासन दिले.

जगभरातील सर्वात आदरणीय असलेले हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात नाही आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायद्यानुसार त्याचे व्यवस्थापन बौद्धेतर व्यक्तींकडून नियंत्रित केले जाते, हे बौद्धांवर घोर अन्याय आहे. म्हणून, या कायद्यात तातडीने सुधारणा करावी आणि त्याचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंना सोपवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, संविधान फाऊंडेशनचे गौतम मेश्राम, प्रा. प्रकाश दुधे, हंसराज उंदिरवाडे, बीआरएसपीचे मिलिंद बांबोडे, प्रबुद्ध विचार मंचाचे देवानंद फुलझेले, बंडूभाऊ खोब्रागडे, गौतम डांगे, अमरकुमार खंदारे, नागसेन खोब्रागडे, समता सैनिक दलाचे देवाजी भैसारे, नामदेव उंदिरवाडे, शोभा खोब्रागडे, लहुजी रामटेके, राजकुमार घोडेस्वार, सुमित्रा राऊत, नीता सहारे, प्रदीप भैसारे, बाळकृष्ण बांबोळे, सुखदेव बारसागडे, सुधीर वालदे, शिशुपाल शेंद्रे, भोजराज कान्हेकर, जगन जांभुळकर, सुरेश बारसागडे, मच्छिंद्र वानकर, रमेश डोंगरे, सिद्धार्थ खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, उमा बनसोड, ज्ञानोदय वाळके, अर्चना रामटेके, विजय देवतळे, उषा भानारकर, शहरातील विविध बुद्ध विहार आणि आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते